मंचर - अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी मराठा समाज आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी (ता.३१) जुन्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अवसरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. ‘एक मराठा लाख मराठा’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अभियंता शरद शिंदे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे व आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष भोर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरपंच कमलेश शिंदे, अवसरी खुर्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र भोर, तंटामुक्तगाव समितीचे अध्यक्ष रामदास भोर, दिनेश खेडकर, प्रवीण टेमकर, पोलीस पाटील संतोष शिंदे, मनोज शिंदे, उत्तमराव शिंदे, योगेश वायाळ, गोविंद इंदोरे, विवेक टेमकर उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
शरद शिंदे म्हणाले, 'सकल मराठा समाजाच्यावतीने गाव बंद ठेवून बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी उपोषणात महिला सहभागी झाल्या होत्या. शांतता मार्गाने आंदोलन सुरु आहे. सर्व पक्षीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी आहेत.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.