वाघोली - मनोज जरांगे-पाटील यांचे वाघोलीतील केसनंद फाट्यावर स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते चोखीधानी रोड वरील मैदानात मुक्कामी जाणार आहे. दरम्यान त्यांच्या व सोबतच्या कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी वाघोली व परिसरात सकाळ पासूनच चुली पेटल्या आहेत.
कोरेगाव भीमा येथील दुपारच्या जेवणानंतर ते वाघोलीकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागरिक सायंकाळी पाच वाजता केसनंद फाट्यावर जमा होणार आहेत. त्यांच्या सोबत हजारो कार्यकर्ते असल्याने त्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळ पासूनच तयारीला लागले आहेत.
भाकरी व भाजी बनविण्यासाठी सकाळ पासूनच चुली पेटल्या आहेत. ज्या घरातून भाकरी, भाजी बनविल्या जातील त्या जमा करून मुक्कामाच्या ठिकाणी पोहचविण्यात येणार आहेत. पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य व्यवस्था करण्याचे काम मैदानात युद्धपातळीवर सुरू आहे.
जी मदत देणे शक्य आहे. ती मदत नागरिक देत आहेत. वाघोली चे उपसरपंच राजेंद्र सातव व त्यांच्या पत्नी जयश्री सातव यांनी 15 हजार भाकरी बनविण्यासाठी आपल्या घराजवळच सकाळ पासून चुली पेटविल्या. भाकरी बनविण्याचे काम महिला करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.