Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार? आंदोलक आक्रमक, पुण्यात चाकण परिसरात महामार्गावर रोखल्या बस

राज्यात मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलने होते आहेत.
Maratha Reservation maratha kranti morcha Agitation at chakan pune Nashik highway
Maratha Reservation maratha kranti morcha Agitation at chakan pune Nashik highway
Updated on

राज्यात मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलने होते आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत काल संपली आहे. यानंतर आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला होता यानंतर आज सकाळी याचे पडसाद पुण्यात पाहायला मिळाले.

२४ तारखेला सरकारला दिलेला ४० दिवसांता कालावधी संपला आहे. यानंतर आज मराठा आंदोलक पुण्यातील चाकण परिसरात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. चाकण औद्योगिक क्षेत्रात कामावर निघालेल्या कामगारांच्या बस सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या. तसेच यावेळी कामगारांना कामावर न जाण्याचे आवाहन मराठा आंदोलकांकडून करण्यात आलं. पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर या कामगारांच्या बस रोखण्यात आल्या.

Maratha Reservation maratha kranti morcha Agitation at chakan pune Nashik highway
Dasara Melava 2023 : राज ठाकरेंची स्तुती केल्याने आनंद दिघेंचे पंख छाटले; CM शिंदेचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज चाकण औद्योगिक क्षेत्र येथे एक दिवसाच्या बंदची हाक देण्यात आली होती. असे असताना देखील कामकार कामावर जात असल्याने चांडोली टोलनाक्यावर त्यांना घेऊन जाणाऱ्या बसेसे रोखण्यात आल्या. यावेळी बस रोखल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Maratha Reservation maratha kranti morcha Agitation at chakan pune Nashik highway
Uddhav Thackeray Dasara Melava : फडणवीसांनी माणसं संपवली, आता चंद्रकांत पाटलांच्या मागे लागले; सुषमा अंधारेंचा घणाघात

मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. राज्य सराकरने २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाहीत तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

तसेच मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कुठल्याही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेतल्यानंतर गावात यायचं. महाराष्ट्रभर सर्कलमध्ये २५ तारखेपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. २८ पासून तेच साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार आहे, याची तयारी मराठा समाजाने केली आहे, असे जरांगे पाटील

यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच त्यांनी प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात मराठा समाजाने सरकारला जागे करण्यासाठी एकत्र यावे. व शांततेत आंदोलन करावे, असे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.