पुणे - मराठा आरक्षणासाठी रविवारी (ता. ११) निघालेल्या शांतता रॅलीमध्ये चोरट्यांनी सोनसाखळी, मोबाईल आणि रोकड चोरी केल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी विश्रामबाग आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.