Maratha Reservation : मराठा-ओबीसी संघर्ष पेटला! शासकीय विश्रामगृहात येऊन स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने भुजबळांना सुनावलं

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
Updated on

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यात संघर्ष पेटत आहे. यादरम्या स्वराज संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी शासकिय विश्रामगृहात जाऊन छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांचा इशाराच आहे. चिथावणी देऊन ओबीसीचा वाद लावला जात आहे. भुजबळ साहेब थोडं सबुरीने घ्या. वेळ पडली तर भुजबळांची गाडी इथेही फोडू शकतो असं विधान त्यांनी केलं आहे.

दरम्यान या इशाऱ्यानंतर ओबीसी समाजातील बांधव आक्रमक झाले असून आमच्या दैवताला जर कोणी इशारा देत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल अशी भावन देखील व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय झालं?

पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक सुरू असताना अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत होते मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना आव्हान दिलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली. तसेच गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराही दिला. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधवला आतमध्ये कसं सोडलं असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना उपस्थित केला. जाधव यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले.

Chhagan Bhujbal
Pune Rain News :आंबेगाव परिसरात गारपीट व पावसाने 500 हेक्टर क्षेत्रातील कांदा, बटाटा, वाटाणा पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतेत

धनंजय जाधव काय म्हणाले?

चिथावणी देऊन ओबीसी-मराठा वाद पेटवला जात आहे. तुम्ही पाहू शकता येथे माझ्या समोर भुजबळांची गाडी आहे. वेळ पडली तर ती फोडून त्यांचा निषेध केला जाऊ शकतो. ओबीसीच्या नेत्यांना विनंती आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नख लावू नका. अन्यथा या गोष्टी हताबाहेर जातील. विनंती आहेआमच्या लेकराबाळांना मिळणाऱ्या आरक्षाण्याच्या आड येऊ नका. हात जोडून विनंती आहे भुजबळ साहेब सबुरीने घ्या.

Chhagan Bhujbal
Mumbai Air Quality : ...म्हणून मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; महत्त्वाच्या भागातील AQI जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.