Maratha Reservation : विघ्नहरचा राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत होणारा गाळप हंगामाचा कार्यक्रम रद्द

मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठींबा देताना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत होणारा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला.
Satyashil Sherkar
Satyashil Sherkarsakal
Updated on

जुन्नर - मराठा आरक्षणाच्या मागणीस पाठींबा देताना राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत (गुरुवारी ता. ०२ रोजी) होणारा येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला असून हा कार्यक्रम उद्या बुधवार (ता. १) रोजी सकाळी १० वाजता साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पत्रकारांना सांगितले.

हा कार्यक्रम ज्येष्ठ नेते पद्मविभूषण शरद पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम,खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके व स्थानिक नेते उपस्थितीत होणार होता.कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या होत्या. दरम्यान आंदोलन तीव्र होऊ लागल्याने समाज मनाचा विचार करून आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या उसाला विनाकपात ३ हजार ५० रुपये अंतिम भाव देण्यात येणार आहे तर कामगारांना १५ टक्के बोनस, फरकाची रक्कम व पगार दिवाळीपूर्वी करण्यात येणार असल्याने शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याचे शेरकर यांनी सांगितले.

मराठा आंदोलक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते विघ्नहरच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार.

- सत्यशिल शेरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.