6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक रायगडावर झाला होता. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो.
पुणे- 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक रायगडावर झाला होता. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो. यावर्षीही हा सोहळा रायगडावर साजरा करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. यासाठी बहुसंख्येने पुण्यातील मराठे ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाला जाणार आहेत. यासंदर्भातील निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव , रधुनाथ चित्रे पाटील , सचिन अडेकर व इतर महत्त्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (Marathas from Pune will go to Raigad 6 june Maratha Kranti Morcha sambhaji raje)
आज २ जून रोजी मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून शिवभक्तांना व मराठ्यांना रायगडाला जाताना आडवू नये, अशी भूमिका एकमुखाने सर्वांनी मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चाललेल्या सरकारने शिवरायांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जाताना शिवभक्तांना वेठीस धरून अडवणूक करू नये, असंही बैठकीत सांगण्यात आलं आहे. बहुसंख्येने पुण्यातील मराठे रायगडावर जातील, असं मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केलं.
दरम्यान, मराठा आरक्षणप्रकरणी सध्या या समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या मुद्द्यावरुन महाराष्ट्रभर दौरे केले. त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीने मराठा आरक्षणप्रकरणी काहीतरी ठोस मार्ग काढावा, अन्यथा 6 जून रोजी रायगडावरुन आपली भूमिका स्पष्ट करु, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. त्यामुळे संभाजीराजे 6 जूनला रायगडावर जातील हे निश्चित आहे. रायगडावरुन ते काय घोषणा करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.