Madhura Kunjir
Madhura Kunjirsakal

Motivation Story : मराठमोळ्या कन्येचा लष्करामध्ये डंका; मधुरा कुंजीर हिने घातली लेफ्टनंट पदाला गवसणी

स्पर्धा परीक्षेतून लेफ्टनंट बनलेली मधुरा पुणे जिल्ह्यातील पहिलीच युवती ठरली आहे. या यशाने एका मराठी मुलीचा कर्तुत्वाचा डंका महाराष्ट्रभर वाजला आहे.
Published on

उरुळी कांचन - उरुळी कांचन, तालुका हवेली येथील मधुरा संतोष कुंजीर या शिक्षक दांपत्याच्या कन्येने‌ केंद्रीय लोकसेवा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. स्पर्धा परीक्षेतून लेफ्टनंट बनलेली मधुरा पुणे जिल्ह्यातील पहिलीच युवती ठरली आहे. या यशाने एका मराठी मुलीचा कर्तुत्वाचा डंका महाराष्ट्रभर वाजला आहे.

९ मार्च रोजी चेन्नई येथे झालेल्या दिक्षांत समारंभात तिला लेप्टनंट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी झालेल्या परेडमध्ये‌ २४० कॅडेट मधून ॲकॅडमीने ध्वज घेण्याचा मान तिला देण्यात आला. प्रशिक्षणानंतर मधुराची भारतीय सैन्य दलामध्ये आसाम येथे लेफ्टनंट पदावरती वर्णी लागली आहे.

यावेळी मधुराचे वडील संतोष कुंजीर, आई स्वाती कुंजीर व आजी सिंधु कुंजीर, मामा गौरव जगदाळे उपस्थित होत्या. मुळचे वाघापूर ता. पुरंदर येथील हे शिक्षक दांपत्य गेली २५ वर्षापासून उरळी कांचन येथे स्थायिक झाले आहे. मधुरा हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उरुळी कांचन येथे झाले.

उच्च माध्यमिक शिक्षण फर्ग्युसन विद्यालय पुणे येथे त्यानंतर पी आय सी टी कात्रज येथील कॉलेजमध्ये इंजीनियरिंग पूर्ण झाल्यानंतर तिला एका खाजगी कंपनीमध्ये १० लाख पॅकेजची नोकरी मिळाली. परंतु भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होण्याची तिची मनोमन इच्छा होती त्यामुळे अभ्यास करण्यासाठी तिने नोकरीचा राजीनामा दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सीडीएस परिक्षेमध्ये देशात ११ वा क्रमांक मिळवला. त्यानंतर तिने ऑफीसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे खडतर प्रशिक्षण पुर्ण करण्याचे आव्हान स्विकारले. १ वर्षाचे खडतर प्रशिक्षण पुर्ण करताना अनेक समस्या आल्या. परंतु देशसेवा करण्याची प्रबळ इच्छाशक्ती जोरावर तिने प्रशिक्षण पूर्ण केले.

कुटुंबांमध्ये ८ शिक्षक असणाऱ्या मधुराने कुटुंबियांच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

एकाच गावामध्ये तब्बल ३०० शिक्षक असणाऱ्या मुळ गाव वाघापूर ता.पुरंदर येथील मधुराचे कुंजीर कुटुंबीय. नोकरीच्या निमित्ताने उरुळी कांचन येथे स्थायिक झाले. या कुटुंबामध्ये एकूण ८ शिक्षक आहेत. मधुराचे आजोबा कै. लक्ष्मण कुंजीर हे शिक्षक होते. आजी सिंध कुंजीर या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत.

वडील संतोष कुंजीर व आई स्वाती कुंजीर, चुलते रमेश कुंजीर व चुलती मनिषा कुंजीर, आत्या वासंती कुंजीर, मनिषा कुंजीर हे सर्वजण शिक्षक आहेत. एकाच कुटुंबामध्ये ८ शिक्षक असणाऱ्या मधुराने हटके व आदर्श वाट निवडत कुंजर कुटुंबीयांच्या शिर्फेचा मानाचा तुरा रोवला आहे.

मधुरा कुंजीर

या यशामागे माझे आई-वडील, आजी, कुंजीर व जगदाळे कुटुंबीय यांचा मोठा वाटा आहे. कुटुंबामध्ये मी एकुलती एक मुलगी असून सुद्धा त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. लेफ्टनंट पदाची वेगळी वाट निवडल्याचा आनंद आहे .यामुळे भविष्यात अनेक मराठी मुली देश सेवा करण्यासाठी पुढे येतील अशी आशा वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()