Pune News : विनाकारण मला ट्रोल करायचं काम सुरू - अजित पवार

भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात. सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचं काम करत आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

मार्केट यार्ड - काहीजण विनाकारण मला ट्रोल करत आहेत. गुरुवारी मी दिवसभर मंत्रालयात होतो. एक लाख पन्नास हजार मुलामुलींची भरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात सुरू आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि काहीही व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर वेगळ्या बातम्या पसरवतात, अशा टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, मी काल आरोग्य विभागाचा आढावा घेत होतो. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. तो स्टाफ भरण्याची प्रक्रिया चालू आहे. शिक्षण विभागातही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, त्या ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतले आहे.

भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात. सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचं काम करत आहेत. आपण वेगवेगळ्या विभागात १ लाख ५० हजार मुला मुलींची भरती करणार आहोत. ही सगळ्यात मोठी भरती असणार आहे.

आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची या प्रश्नावर पवार म्हणाले, निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. ज्यांना बोलावलं ते जाणार आहोत. आमची बाजू कशी उजवी हे आम्ही सांगणार आहोत.

मराठवाड्यातील विकासासंदर्भात होणार चर्चा

संभाजीनगरमधील बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आज आणि उद्या मंत्रीमंडळासह अधिकारी वर्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मी देखील संभाजीनगरमध्ये जाणार असल्याचे सांगत पवार म्हणाले, संभाजीनगरमध्ये काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मराठवाड्यातील जे आठ जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांच्या विकासाच्या संदर्भात चर्चा होणार आहे.

मराठवाड्यात पावसानं चांगलीच ओढ दिली आहे. अनेक भागात शेतकर्‍यांची पिकं करपून गेली आहेत. राज्यातही काही भागात अशी स्थिती आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं स्थिती चांगली आहे. हवामान विभागानं आणखी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.