आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग सुरू पण...

Mauli Palkhi Departure Ceremony preparation started in Alandi.jpg
Mauli Palkhi Departure Ceremony preparation started in Alandi.jpg
Updated on

आळंदी : आळंदीत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग सुरू झाली. १३ जुनला माऊलींच्या पादुकांचे प्रस्थान पंढरीच्या दिशेन होईल. पादुका सतरा दिवसांसाठी (ता.३०)पर्यंत आळंदीत माऊली मंदिरातच राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानने निर्णय घेतला. तर राज्यशासनाने पायी वारीवर बंदी घातल्याने आळंदीत येणारा वारकऱ्यांचा ओघ थांबला आहे.

दरवर्षी आळंदीत वारीसाठी राज्यभरातून लाखो लोक येतात. पालखी प्रस्थानचा सोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवण्यासाठी आळंदीतील धर्मशाळा, तसेच मोकळ्या जागेत राहूट्या टाकून मुक्कामी राहतात. तर इंद्रायणी काठी तिर्थस्नानासाठी गर्दी होती. वारकऱ्यांच्या गर्दीने दोन्ही काठ फूलून जातात. मात्र, यंदाच्या वर्षी राज्य सरकारने पायी वारीवर बंदी घातल्याने एकही दिंडी आळंदीत आली नाही.आळंदीत कोरोनाचा रूग्ण सापडल्याने प्रतिबंधित क्षेत्र केले आहे. राहूट्या नाही. वारकरी नाही. टाळ मृदंगाचा गजर नाही. अभंगाची सुरावट नाही. इंद्रायणी दुथडी भरून वाहते मात्र तिर्थस्नानासाठी गर्दी नाही. इंद्रायणी घाटावर निरव शांतता आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
मोजक्या व्यक्तींना घेत प्रस्थान सोहळा पार पडणार असल्याने आळंदीत वारकऱ्यांची गर्दी कमी असली तरी प्रस्थानचा आनंद कमी झाला नाही. प्रत्येक वारकऱ्याने आत्मभान आणि समाजस्वास्थ्यासाठी आळंदीत न येता राज्य सरकारच्या सुचनेस प्रतिसाद दिला. आणि स्वताच्या घरातच ज्ञानेश्वरही पारायण, हरि भजन करत यंदाची वारी पार पाडायचा निष्चय केला आहे. यामुळे यंदाचा सोहळा वारकऱ्यांच्या गर्दीशिवाय पार पडणार असला तरी आनंद काही कमी नाही. वारकरी, माऊली आणि पांडुरंग हे समीकरण असल्याने जरी देहाने एकत्र आले नसले तरी मनाने कधीच एकमेकांशी भेटले आहेत.
पुणे : अपघातास कारणीभूत ठरलेली अष्टापुर येथील 'ती' विहिर बुजवणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.