आज जाहीर झालेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्षाने (AAP ) स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. 15 वर्षांपासून दिल्ली पालिकेत सत्ता असलेल्या भाजपला आपने धक्का दिला आहे. दिल्लीत विधानसभेनंतर महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची सत्ता स्थापन होणार आहे.
दरम्यान आपने दिल्लीत मिळवलेल्या या विजयाचे पडसाद थेट पुण्यात देखील पडल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली महानगर पालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पुण्यात आम आदमी पक्षाकडून जल्लोष करण्यात आला. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत दुपारी चार वाजेपर्यंत मिळालेल्या निकालानुसार आम आदमी पक्षाला १३४ जागांवर विजय मिळाला, तर भाजपाने १०४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस नऊ जागांवर विजयी झाले आहे. तसेच एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.
हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
या विजयानंतर पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात आप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या निवडणुक निकालांचे स्वागत केले. राज्य संघटक विजय कुंभार, शहरअध्यक्ष अभिजीत मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे, लाडू भरवत आनंद साजरा केला.
तसेच दिल्लीत मिळालेल्या यशानंतर पुण्यात रॅली देखील काढण्यात आली. आधी पंजाब झाले, आता दिल्ली जिंकली आगामी काळात पुणे महानगर पालिकेवर आपचा झेंडा फडकेल असा विश्वास देखील यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
दिल्ली एमसीडी निवडणुकीतील विजयानंतर आम आदमी पक्षाच्या विजयानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. एवढा मोठा आणि बदल घडवणाऱ्या विजयासाठी सर्वांचे अभिनंदन. आतापर्यंत जनतेने जी जबाबदारी दिली, ते म्हणजे शाळा, रुग्णालय, वीज समस्या आम्ही सगळ ठीक केलं. आता दिल्लीकरांनी साफ-सफाई करण्याची, पार्क ठिक करण्याची जबाबदारी दिल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत.
सर्वच पक्षांच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना केजरीवाल म्हणाले की, आता आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. मी सर्व पक्षांच्या उमेदवारांना आवाहन करतो की, राजकारण आजपर्यंतच होते.
आता आपल्याला दिल्ली ठिक करायची आहे, त्यासाठी मला भाजप आणि काँग्रेसचे सहकार्य हवे आहे. आम्हालाही केंद्र सरकारचे सहकार्य हवे आहे. दिल्ली ठिक करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आशीर्वाद हवेत. जे २५० नगरसेवक विजयी झाले ते कोणत्याही पक्षाचे नाहीत, ते दिल्लीतील नगरसेवक आहेत, असंही केजरीवाल म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.