Pune News : सहकारी संस्थांचे उत्पन्न वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र सहकार विकास मंडळ मदत करणार; मिलिंद आकरे

दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील सहकारी संस्था व शेतकरी कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मोहीम अधिक गतिमान
mcdb milind akare says increase income of cooperatives and employment dilip walse patil politics
mcdb milind akare says increase income of cooperatives and employment dilip walse patil politicssakal
Updated on

मंचर : “राज्यात सहकारी संस्थाचे मोठे जाळे आहे. ग्रामीण भागाचा विकासाचा कणा म्हणूनच सहकारी संस्थांची ओळख आहे. बदलत्या काळानुसार सहकारी संस्थांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी सेंद्रिय शेतीला पूरक खते औषधे, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग व शेतीपूरक व्यवसाय उभे करण्यावर भर द्यावा.

त्यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सर्व सेवा, सुविधा व प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे.” असे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे शरद सहकारी बँकेच्या सभागृहात आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, संचालक मंडळ यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत व चर्चासत्रात आकरे बोलत होते.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव तथा अतिरिक्त जिल्हा अधिकारी नवनाथ जरे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश खिलारी, भीमाशंकर अँग्रोटेक कंपनीचे उपाध्यक्ष दिनेश खुडे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर उपस्थित होते.

आकरे म्हणाले, “ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील सहकारी संस्था व शेतकरी कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मोहीम अधिक गतिमान केली जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना,

स्थानिक बाजारपेठेचा अंदाज घेवून गरजेनुसार उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, खेळते भांडवल, उत्पादित शेतीमालाचे पँकिंग, ब्रँडिंग आदी कामाबाबत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ काम करत आहेत. त्यासाठी सहकारी संस्थांनी पुणे येथील साखर संकुलाच्या आवारातील कार्यालयाशी संपर्क करावा.

प्रशांत चासकर यांनी सहकारी संस्थाच्या प्रगतीसाठी चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. उपस्थितीतानी विचारलेल्या प्रश्नांना आकरे यांनी समर्पक उत्तरे दिली. पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, सुहास बाणखेले, रमेश खिलारी, पंडित माशेरे, आदींनी भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.