वैद्यकीय ऑक्सिजननिर्मितीचा यक्षप्रश्न सुटला; उपयुक्त झिओलाइट निर्मितीत ‘एनसीएल’ यशस्वी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले होते. वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजननिर्मितीसाठी आवश्यक झिओलाईट आपण परदेशातून आयात करत होतो.
medical oxygenation problem solved NCL succeeds in producing useful zeolite
medical oxygenation problem solved NCL succeeds in producing useful zeolite Sakal
Updated on

Pune News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले होते. वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजननिर्मितीसाठी आवश्यक झिओलाईट आपण परदेशातून आयात करत होतो.

वेळेवर त्याची पुर्तता न झाल्यामुळे देश म्हणून आपण अक्षरशः हतबल झालो होता. ऑक्सिजननिर्मितीतील हा यक्षप्रश्न आता सुटला असून, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) या वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजननिर्मितीसाठी लागणाऱ्या झिओलाईटची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे जगात उपलब्ध झिओलाईटपेक्षा हा अधिक कार्यक्षम आहे.

एनसीएलच्या उत्प्रेरक संशोधन विभागाचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. विजय बोकाडे यांच्या नेतृत्वात हे संशोधन झाले. डॉ. बोकाडे सांगतात, ‘‘वैद्यकीय वापरासाठी ९३ टक्क्यांपेक्षा अधिक शुद्ध ऑक्सिजनची गरज असते.

यासाठी मुख्यत्वे प्रेशर स्विंग तंत्रज्ञानाचा वापर होतो. हवेतील नायट्रोजनला पकडून ऑक्सिजनचे संवर्धन करण्यासाठी झिओलाईट हा पदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतो. म्हणून तीन वर्षांपूर्वी ‘एनसीएल’च्या शास्त्रज्ञांनी यात काम सुरू केले होते. आज संस्थेकडून चाचणीही करण्यात आली आहे.’’ ‘एनसीएल’ने यासंदर्भातील झिओलाईटसाठी पाच पेटंटसाठी अर्ज केले आहेत. चीन, फ्रान्स आणि अमेरिकेवरचे अवलंबित्व यामुळे संपुष्टात येणार आहे.

सहभागी शास्त्रज्ञ

‘एनसीएल’चे संचालक डॉ. आशिष लेले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बोकाडे, डॉ. सी.एस. गोपीनाथ, डॉ. निलेश माळी, डॉ. आशिष ओरपे, डॉ. प्रशांत निफाडकर, डॉ. हर्षवर्धन पोळ, डॉ. सचिन नंदनवार, डॉ. सपना रविंद्रनाथन, डॉ. के. सेल्वराज, डॉ. टी. राजा, डॉ. बी. एल. वी. प्रसाद यांच्यासह संशोधक विद्यार्थ्यांचाही यात महत्त्वपूर्ण सहभाग.

संशोधनाचे महत्त्व

१) ऑक्सिजन संवर्धन

‘एनसीएल’ने विकसित केलेल्या झिओलाईटसाठी लागणारा बाईंडर घटकही झिओलाईट म्हणून कार्य करतो. त्यामुळे ऑक्सिजन संवर्धक नलिकेतील ३० टक्के बायंडर घटक झिओलाईट म्हणून वापरला जातो आणि पर्यायाने उत्पादकता ३० टक्क्यांनी वाढते. झिओलाईटची कार्यक्षमता पाच वर्षांची असून, त्यानंतर तो बदलावा लागतो. कोरोना काळातील ऑक्सिजन संवर्धक संच आता पाच वर्षांचे झाल्यावर देशात मोठ्या प्रमाणावर झिओलाईटची गरज भासणार आहे.

२) हायड्रोजन आणि बायोसीएनजी

स्वच्छ इंधन म्हणून बायोसीएनजी आणि हायड्रोजनचा वापर होत आहे. यांच्या संवर्धनासाठी झिओलाईटचा वापर होतो. देशाची ही गरज या संशोधनामुळे पूर्ण होणार आहे. कार्बनच्या विलगीकरणासाठी आवश्यक झिओलाईटही शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.