Meenakshi Seshadri : अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार

मीनाक्षी शेषाद्री यांची घोषणा; आता पुण्याची रहिवासी
pune
punesakal
Updated on

पुणे - ‘‘कारकिर्दीत सर्वोच्च स्थानावर असताना मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले आणि अमेरिकेला गेले. त्यानंतर कामात अनेक वर्षांचा खंड पडला. पण आता मी भारतात परतले असून अभिनय आणि नृत्य क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. माझ्याकडे सध्या काही ऑफर देखील आहेत. लवकरच एखाद्या चित्रपटातून किंवा वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येईन’’, अशी घोषणा अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी शुक्रवारी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमांतर्गत शेषाद्री यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, सनी देओल आदी कलाकारांसह काम करताना आलेले अनुभव कथन केले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.

चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याच्या निर्णयाची खंत वाटत नसल्याचे शेषाद्री यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘मी विवाहानंतर अमेरिकेला स्थायिक झाले. कुटुंबाला वेळ दिला. तेथे मुलांना नृत्यही शिकवले. मात्र आता परतले असून पुण्यात स्थायिक झाले आहे. पुनरागमनासाठी खूप वेळ घेतला, असे वाटत नाही. ही योग्य वेळ असल्याने पुनरागमन करते आहे.’’

pune
Pune Dam Water Level : खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस; चार धरणात मिळून २७.५६ टीएमसी म्हणजे ९४.५५ टक्के पाणीसाठा

मराठीमध्ये काम करण्यास आवडेल का, या प्रश्नावर शेषाद्री म्हणाल्या, ‘‘मराठीमध्ये काम करण्यास मी नक्कीच उत्सुक आहे. मराठीतील अनेक अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतातच. त्यात भाषेचा अडथळा येत नाही. मला तर मराठी बरीच समजते. त्यामुळे चांगला चित्रपट आणि उत्तम दिग्दर्शक असेल, तर नक्कीच मराठीत काम करेन.’’

pune
Pune Festival 2023 : पुणे फेस्टिव्हलच्या मेजवानीस प्रारंभ

‘दामिनी’सारखा चित्रपट पुन्हा नाही!

मीनाक्षी शेषाद्री यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दामिनी’ हा चित्रपट खूप गाजला होता. प्रेक्षकांसह समीक्षकांनी पण त्याचे खूप कौतुक केले होते. ‘‘या चित्रपटानंतर असे परखड भाष्य करणारे अनेक चित्रपट येतील असे वाटले होते. मात्र तसा चित्रपट पुन्हा आला नाही आणि अभिनेत्रींनाही तसे काम करायला मिळाले नाही’’, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.