पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार आणि ब्राह्मण समाजाची बैठक नुकतीच संपली. या बैठकीत काय चर्चा झाली याचा तपशील ब्राह्मण समाजानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. पवारांसोबत झालेल्या चर्चेत कुठलाही राजकीय अंश नव्हता उलट अत्यंत सात्विक पद्धतीनं ही चर्चा झाली अशी माहिती ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी दिली. (Meeting of Sharad Pawar and Brahmin community in Pune ended)
ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी म्हणाले, "तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि पंजाब या राज्यातील धर्तीवर ब्राह्मण समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचं एक निवेदन दिलं आणि त्यांनी याचं निवेदन स्विकारलं आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत असल्यानं लवकरात लवकर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बैठकीचं नियोजन करुन अशा शब्द शरद पवार यांनी दिला आहे. ब्राह्मण समाजाशी असलेलं त्याचं नातं यावर त्यांनी अतिशय विस्तृत विवेचन केलं आहे. या सर्व गोष्टीवर अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्यावतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते समाधानी आहोत"
आणखी एक पदाधिकारी गोविंद कुलकर्णी म्हणाले, "आजची सभा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असणारी नाही, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं. एखाद्या निवडणुकीची ही पूर्वतयारी आहे असा जर कोणाचा गैरसमज असेल तर तो दूर करावा असं त्यांनी बजावलं. त्याचबरोबर ब्राह्मण समाजाची ज्या ज्या क्षेत्रात आज प्रगती आहे. त्याची त्यांनी मनमोकळे पणानं दखल घेऊन प्रशंसा केली आहे. ब्राह्मण समाज कोणत्या क्षेत्रात किती टक्के काम करतोय याची बारीक नोंद करुन शरद पवार यांनी मनापासून कौतुक केलं आहे. तसेच याप्रकरणी कोणत्याही प्रकारे सामाजिक, जतीय विद्वेष वाढणार नाही याची प्रत्येकानं खबरदारी घेतली पाहिजे असं त्यांनी प्रत्येकाला बजावलं आहे. तसेच त्यांच्या जीवनात जे दोन ब्राह्मण गुरु भेटले त्यांच्याप्रती त्यांनी आदर व्यक्त केला आहे. त्यामुळं आजची सभा अत्यंत सात्विक आणि राजकारणाच्या चर्चेशिवाय पार पडली."
गेल्या एक-दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये राष्ट्रवादीच्या विविध सभा झाल्या या सभांमधून आमच्या नेते मंडळींची काही भाषण झाली यामध्ये ब्राह्मण समाजामध्ये राग निर्माण झाला. त्यानंतर माध्यमातून हा विषय पसरला. त्यानंतर संपूर्ण समाजात विषारी पद्धतीचं राजकारण उभं राहिलं. यातून ब्राह्मण समाजात अस्वस्थता मोठ्या प्रमाणावर दिसून आली. कोणताही राजकीय पक्ष आणि त्यांचा कोणताही नेता त्याचं हे कर्तव्य आहे की तिथल्या समाज घटकातील अस्वस्थता दूर करणं. या कर्तव्य भावनेतूनच शरद पवारांनी आजची बैठक घेतली. या बैठकीत ब्राह्मण समाजाचे सर्व प्रश्न ऐकून घेतले ते सर्व प्रतिनिधींना मांडण्याची संधी दिली गेली. तसेच शरद पवारांनी त्यावर स्वतःच मंत सांगितलं आणि जो तणाव निर्माण झालाय तो कमी करण्याचा प्रयत्न केला, असं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.