पुणे : ऊस संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ‘गव्हर्निंग कौन्सिल’च्या निवडणुकीत १५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. ‘व्हीएसआय’चे महासंचालक तथा निवडणूक समितीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी ही माहिती दिली.
‘गव्हर्निंग कौन्सिल’ मध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे : श्रीराम शेटे (कादवा सहकारी साखर कारखाना, राजारामनगर, दिंडोरी), नरेंद्र घुले पाटील (लोकनेते मारुतराव घुले पाटील साखर कारखाना, नेवासा, जि. नगर) सुरेश कुमार नाईक (आदिवासी साखर कारखाना नवापूर, जि. नंदुरबार), अशोक पवार (रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखाना शिरूर, जि. पुणे), बबनराव शिंदे (विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना माढा, जि. सोलापूर), अरविंद गोरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, उस्मानाबाद), सतेज पाटील (डॉ. डी. वाय. पाटील कारखाना गगनबावडा, जि. कोल्हापूर),
प्रकाश आवाडे (जवाहर शेतकरी कारखाना हुपरी, जि. कोल्हापूर), विश्वजीत कदम (डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना वांगी, जि. सांगली), बाळासाहेब पाटील (सह्याद्री साखर कारखाना कराड, जि. सातारा), दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, लातूर), राजेश टोपे (कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना अंबड, जि. जालना), गणपतराव तिडके (भाऊराव चव्हाण साखर कारखाना अर्धापूर, जि. नांदेड), रोहित पवार (बारामती ऍग्रो बारामती, जि. पुणे) आणि हर्षवर्धन पाटील (इंद्रेश्वर शुगर मिल्स बार्शी, जि. सोलापूर).
‘व्हीएसआय’चे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असून, ट्रस्टीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विशाल पाटील, जयप्रकाश दांडेगावकर आणि बी.बी. ठोंबरे यांचा समावेश आहे. त्यांच्या व्यतिरिक्त ‘गव्हर्निंग कौन्सिल’च्या निवडणुकीत नवीन १५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
- शिवाजीराव देशमुख, ‘व्हीएसआय’, महासंचालक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.