Corona Virus : सहकार विभागाचे सोसायट्यांना निर्देश; सभासदांनी खरेदीसाठी गर्दी टाळावी

 Members should avoid rush to buyInstructions to Societies of Co-operation Department
Members should avoid rush to buyInstructions to Societies of Co-operation Department
Updated on

पुणे:  कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून सभासदांनी अनावश्यक गर्दी टाळावी, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश सहकार विभागाने गृहनिर्माण सोसायट्यांना दिले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ  प्रवेश करणाच्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्यास सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्यास आवश्यक किराणा, भाजीपाला आदी बाबींची मागणी संकलित करून त्यानुसार जवळच्या किराणा व भाजीपाला पुरवठा करणाऱ्या दुकानधारकास जीवनावश्यक वस्तूंची मागणी (सदस्य निहाय) देऊन सामान गेटवरतीच मागवून घ्यावे. एकेका सदस्याच्या घरी सिक्युरीटीमार्फत सामान पोचवावे किंवा प्रत्येक घरातील एका सदस्यास बोलवून गेटवरती त्याचे वाटप करावे. मात्र ते करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- Coronavirus : 'हे' आहेत जगातील 'टॉप १०' खतरनाक व्हायरस!

सोसायटीतील सभासद तातडीच्या न टाळता येणाऱ्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. कोरोना संसर्गजन्य साथीच्या रोगाच्या प्रतिबंधासाठी नेमण्यात आलेले आरोग्यसेवक, डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉईज यांना त्यांच्या निवडीच्या वेळेप्रमाणे सोसायटीमधून जा-ये करण्यास कोणत्याही प्रकारे प्रतिबंध करु नये. आरोग्यसेवक, डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉईज व इतर मेडीकल कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असल्याने त्यांच्यासोबत सौजन्याची वागणूक ठेवावी. तसेच, ते सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेवून राहत असल्यास त्यांना कोणत्याही वाजवी कारणाशिणय सदनिका सोडण्याबाबत दबाव आणू नये. या प्रकरणी सर्व आवश्यक खबरदारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश पुणे शहर (क्रमांक 6) उपनिबंधक सहकारी संस्था उज्वला माळशिकारे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.