विद्या प्रतिष्ठान आणि कॅपजेमिनी टेकनॉलॉजी दरम्यान सामंजस्य करार

ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी निर्माण होणार
विद्या प्रतिष्ठान व कॅपजेमिनी दरम्यान सामजंस्य
विद्या प्रतिष्ठान व कॅपजेमिनी दरम्यान सामजंस्य sakal
Updated on

बारामती: ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासह, अध्यापक व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, उदयोन्मुख तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन, संवाद कौशल्ये सुधारणे आणि ग्रामीण युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विद्या प्रतिष्ठान व कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

विद्या प्रतिष्ठान व कॅपजेमिनी दरम्यान सामजंस्य
जाधव महाविद्यालयात ‘सावित्री महोत्सव’

कॅपजेमिनी ही प्रथितयश तंत्रज्ञान सेवा पुरवणारी फ्रेंच कंपनी असून तिचा विस्तार 50 देशांत झाला आहे. या सामंजस्य करारामुळे औद्योगिक आणि शैक्षणिक परस्परसंवादाला चालना मिळेल, कृत्रिम बुद्धिमत्तेसह (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) तेरा विविध प्रकारच्या तंत्रज्ञानात उपक्रम राबविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा कॅपजेमिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेटे यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1972 पासूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालने खुली करुन देण्याचे काम विद्या प्रतिष्ठानने केले आहे. विश्वस्त विठ्ठल मणीयार संस्थेच्या कमलनयन बजाज इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि या अभियांत्रिकी महाविद्यालयाने गेल्या साडे तीन वर्षात 1150 विद्यार्थ्यांना नावाजलेल्या कंपनीत प्लेसमेंट मिळवून दिली आहे.

विद्या प्रतिष्ठान व कॅपजेमिनी दरम्यान सामजंस्य
पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून अल्पवयीन मुलांचा चोरीचा प्रयत्न

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी (ता. 13) व विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी मध्ये सामंजस्य करार झाला.

अभ्यासक्रमातील पोकळी भरून काढून उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी कॅपजेमिनी कंपनीतील तज्ज्ञ प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणाचा कालावधी दीड वर्षांचा असेल, यात विशेष सॉफ्टवेअर प्रशिक्षण, इंटर्नशिप, आणि प्रोजेक्ट्स यांचा समावेश असेल. कॅड कॅम ऑटोमेशन, कस्टमायझेशन आणि संबंधित सॉफ्टवेअर या कौशल्यांचा विकासापासून या कराराच्या प्रारंभिक टप्याच्या अंमलबजावणीची सुरुवात होईल.

या प्रसंगी विश्वस्त विठ्ठल मणीयार संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कॅपजेमिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष अनुराग प्रताप, प्रसाद शेटे, संचालक गिरीश बोरा, तेजिंदर कौर सेठी, रश्मी बापट, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव अँड. नीलीमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, डॉ. संतोष भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.