पुणेकर राजूची अकाली ‘एक्झिट’ धक्का देणारीच !

राजीव सातव यांचा जन्म पुण्यातील. बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळ त्यांचे आजोळ...
rajiv satav
rajiv satavSakal Media
Updated on

पुणे ः ‘‘राजू अगदी साधा होता. आई मंत्री असतानाही त्याचा रूबाब त्यानं कधी दाखविला नाही. त्याला शाळेत सोडायला, मोटार यायची त्यातून तो मित्रांना घरी सोडायचा. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावरही तो सगळ्यांच्या संपर्कात होता. त्याची अकाली ‘एक्सिट’ ही ही धक्का देणारी ठरली,’’ अशी प्रतिक्रिया राजीव सातव यांच्या शालेय मित्रांनी व्यक्त केली. राजू हा पुणेकरच होता. तो आपल्यात नाही, ही कल्पनाच आता सहन होत नाही, असेही त्यांना वाटतंय.

राजीव सातव यांचा जन्म पुण्यातील. बुधवार पेठेतील दत्त मंदिराजवळ त्यांचे आजोळ. तेथे आजीकडे त्यांचा वावर असायचा. पहिली ते दहावीपर्यंतचं त्यांचा शिक्षण अप्पाबळवंत चौकातील नूतन मराठी विद्यालयात झालं. त्यानंतर फर्ग्युसनमधून त्यांनी शास्त्र शाखेची पदवी घेतल्यावर सिंबायोसिसमध्ये विधी शाखेची पदवी घेतली. या काळात जडणघडणीच्या काळात पुण्यात त्यांनी असंख्य मित्र जोडले. आयुष्यातील पहिली २३- २४ वर्षे त्यांची पुण्यातच गेल्यामुळे या शहराचा त्यांनाही अभिमान होता. नूमविमधून १९८९ मध्ये दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडले. त्याचे वर्गमित्र केतन नांगरे म्हणाले, ‘‘राजीव हा अभ्यासातही हुशार होता. सातवी ते दहावी तो आमच्या वर्गोचा मॉनिटर होता. मित्र जमविण्याची त्याची हातोटी होती. शांत स्वभाव असल्यामुळे मित्रांमध्ये लोकप्रिय होता. आमच्या बॅचला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही त्याला पुण्यात बोलविले. तेव्हा तो खासदार होता. उत्साहाने आला. त्याने छान गप्पा मारत भाषणही केलं. दुचाकीवर आम्ही फेरफटकाही मारला. तो कायम संपर्कात होता. त्याला कॉल कधी घेता आला नाही तर, सकाळी ८ पूर्वी किंवा रात्री १० नंतर तो फोन करायचा.’’

rajiv satav
खासदार राजीव सातव यांच्या निधनाने हिंगोली लोकसभा मतदार संघावर शोककळा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सुनील चांदेरे म्हणाले, ‘‘एनएसएसमध्ये असताना सलग दोन वर्षे दहा दिवस तो सूसमध्ये रहायला होता. त्या काळात आमची मैत्री झाली. पुढे आम्ही एनएसएसच्या माध्यमातून दहा दिवसांसाठी बिहारला गेलो. त्यानंतर कायमच संपर्कात राहिलो. अगदी अलिकडच्या काळातही आमचं बोलण व्हायचं’’ तर, कळमनुरी ते दिल्ली व्हाया पुणे असा त्याचा प्रवास मी जवळून पाहिला. एलएलबी करताना राजीव तीन वर्षे आमच्या क्लासला येत, राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील असूनही राजीवचे पाय कायमच जमिनीवर होते, अशी आठवण विधीज्ज्ञ डॉ. सुधाकरराव आव्हाड यांनी सांगितली.

rajiv satav
खासदार राजीव सातव यांना अशोक चव्हाण आणि खासदार चिखलीकर यांची श्रद्धांजली

राजीव यांची विषयांची जाण पक्की होती. शेतकऱ्यांसाठी वेगळं न्यायाधीकरण असावे, अशा विषयाचं एक विधेयक आम्ही तयार केलं होता. राजीव यांना भेटून त्याची माहिती दिली. विषय महत्त्वाचा असल्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये लोकसभेत ते विधेयक मांडलं आणि मंजूर करण्यासाठी प्रयत्नही केला, अशी आठवण ॲड. असीम सरोदे यांनी सांगितली.

फर्गुसनचे माजी प्राचार्य डॉ. वसंत वाघ म्हणाले, ‘‘राजू वनस्पतीशास्त्र विषय घेऊन बीएससी करीत होता. त्या वेळी मी प्राचार्य होतो. युवा नेता म्हणून त्याचे उभरते नेतृत्व सहज जाणवत होते. राजू आमच्या घरी यायचा, माझ्या दोन्ही मुलांना तो नावानिशी ओळखायचा. विनम्रता, मितभाषी, राजकारणाची आवड हे त्याचे मला त्यावेळी गुण जाणवले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()