Pune : शनिवारी रंगणार मानसरंग नाट्य महोत्सव

मानसिक आरोग्यावरील तीन नाटकांचे सादरीकरण
balgandharva
balgandharvasakal
Updated on

पुणे : मानसिक आरोग्य या विषयावरील तीन नाटकांचा समावेश असणारा मानसरंग नाट्य महोत्सव येत्या शनिवारी म्हणजेच मराठी रंगभूमी दिनी रंगणार आहे. एरंडवणा परिसरातील ‘द बॉक्स’ या नाट्यगृहात दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती ‘मानसरंग’चे अतुल पेठे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. हमीद दाभोलकर, राजू इनामदार आणि रेश्मा कचरे उपस्थित होते. ‘परिवर्तन, सातारा’ या संस्थेतर्फे देण्यात आलेल्या मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती अंतर्गत ही तीन नाटके नव्याने बसवण्यात आली आहेत. यात दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित ‘तो राजहंस एक’, श्रीपाद देशपांडे लिखित व अभिजित झुंजारराव दिग्दर्शित ‘रंगीत संगीत गोंधळ’ आणि ओंकार गोखले लिखित व क्षितीश दाते दिग्दर्शित ‘न केलेल्या नोंदी’ या तीन दीर्घांकांचा समावेश आहे, असे पेठे यांनी सांगितले.

मानसिक आरोग्याच्या प्रश्नांसाठी ‘मानसरंग’

परिवर्तन संस्थेमार्फत गेली पाच वर्षे मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर कला अभिव्यक्तीच्या माध्यमातून उपचार आणि प्रबोधन करण्यासाठी मानसरंग नावाचा मंच चालवला जातो. या मंचांतर्गत या वर्षीपासून मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर नाटकाच्या माध्यमातून भाष्य आणि जनजागृती करण्यासाठी मानसरंग नाट्य-शिष्यवृत्ती देण्यात आली होती. पहिल्या नाट्य-शिष्यवृत्तीसाठी निवडलेले तिन्ही नवीन पिढीचे दिग्दर्शक आहेत, असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.