पुणे : वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी गुजरातमध्ये गेल्यानंतर पुण्यातील वाहन क्षेत्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या सर्वात एक नवीन सकारात्मक बाब पुढे आली आहे. जगातील बडी वाहन निर्मिती कंपनी असलेल्या मर्सिडीज-बेंझने शुक्रवारी त्यांची इलेक्ट्रिक सेडान इक्यूएस ५८० (EQS 580) लाँच केले आहे. ही कार कंपनीच्या चाकणमधील प्लांटमध्ये तयार होत आहे. विशेष म्हणजे ही कार तयार करण्याचा पहिलाच प्लांट कंपनीने जर्मनीनंतर भारतात सुरू केला आहे.
देशात आलेल्या या महत्त्वाकांशी प्रकल्पासाठी कंपनीने चाकणला पसंती दिली होती. त्यानुसार दीड कोटींच्या पुढे किंमत असलेली ही कार अखेर बाजारात आली आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प पुण्याबाहेर केल्याचा मोठा फटका येथील वाहन क्षेत्राला बसला आहे. मात्र असे असले तरी पुण्याचे या क्षेत्रातील योगदान मोठे आणि महत्त्वाचे असल्याचे या प्लांटच्यामाध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या कारच्या लॉन्चप्रसंगी मर्सिडीज-बेंझ इंडियाचे ऑपरेशन्स प्रमुख वेंकटेश कुलकर्णी यांनी माहिती दिली की, जागतिक स्तरावर इक्यूएस ५८० ची निर्मिती जर्मनीमध्ये सिंडेलफिंगेन येथे असलेल्या कंपनीच्या मदर प्लांटमध्ये केली जाते. जर्मनीनंतर कंपनीचा भारतात हा पहिलाच असेंबली बेस आहे.
प्लॉटमध्ये एकूण १४ मॉडेल्सचे उत्पादन :
चाकणमधील कंपनीच्या प्लॉटंमध्ये १४ मॉडेल्सचे उत्पादन केले जाते. इलेक्ट्रॉनिक कारच्या उत्पादनासाठी १४० जणांची टिम कंपनीकडे आहे. तर सुमारे ३० तज्ज्ञ ईव्ही परिवर्तकाचा देखील समावेश आहे. मॉडेलच्या संख्येच्या प्लांटमध्ये होणारी वार्षिक गुंतवणूक सुमारे १५० ते २५० कोटींच्या घरात आहे. आत्तापर्यंत मर्सिडीजने त्यावर दोन हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
२० हजार युनिट निर्मितीची क्षमता :
येथील प्लॉटची क्षमता वर्षभरात २० हजार युनिट्सची आहे. कंपनी चालू वर्षात १६ हजार पेक्षा जास्त युनिट्सचे उत्पादन करण्याची नियोजन करीत आहे. येथील बॉडी शॉपचे कामकाज दोन शिफ्टमध्ये चालत आहे. असेंब्ली शॉप सध्या एक शिफ्टमध्ये असून ते या महिन्यात दोन शिफ्टमध्ये सुरू होर्इल.
१५ मिनिटाच्या चार्जिंग मध्ये ३०० किमीची रेंज :
इक्यूएस ५८० ही कार ही कार इक्यूसी आणि इक्यूएस ५३ एएमजीनंतर इलेक्ट्रिक सब ब्रँड इक्यू मध्ये लाँच होणारे तिसरे मॉडल आहे. या कारबाबत कंपनीने दावा केला आहे की, १५ मिनिटाच्या चार्जिंग ती ३०० किलोमीटर धावू शकेल. या कारची एआरएआय प्रमाणित रेंज ८५७ किमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.