सायकल मोहिमेद्वारे ‘सेव्ह द सॉइल’चा संदेश

अन्नाचा प्रत्येक कण खाताना मातीच्या संवर्धानाचा विचार व्हायला हवा : सागर गोन्नागर
message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagar
message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagarsakal
Updated on

पुणे : देशाच्या अर्थव्यवस्थेसह दैनंदिन गरजा भागविण्यासाठी महत्त्वाचे क्षेत्र असलेल्या शेतीची योग्य मशागत ही वाढत्या लोकसंख्येमुळे खाद्य सुरक्षाचे गरज बनली आहे. त्यात सातत्याने शेतीसाठी रसायनांचा होत असलेल्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. मातीची होत असलेली ही हानी थांबविण्यासाठी व याबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यातील तरुणाने एक आगळावेगळा उपक्रम केला आहे.

message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagar
message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagarsakal

येथील २६ वर्षीय सागर गोन्नागर याने सायकल मोहिमेद्वारे ‘सेव्ह द सॉइल’चा संदेश देत कोईम्बतूर ते पुणे असा तब्बल पंधराशे (१५००) किलोमीटरचा प्रवास गुरुवारी (ता. १४) पूर्ण केला. वडगाव शेरी येथील सागर हा मूळचा कर्नाटकचा आहे. तसेच तो सध्या मर्चंट नेव्हीमध्ये सागरी अभियंता म्हणून कार्यरत आहे. सागरने कोईम्बतूर ते पुणे असा सायकल प्रवास करत लोकांमध्ये मातीची सुपीकता कशी वाढवता येईल, याबाबत जनजागृती केली आहे. या मोहिमेची सुरवात २३ मार्च रोजी कोईम्बतूर येथील ईशा योगा सेंटर येथून झाली. तसेच गुरुवारी पुण्यात ही सायकल मोहीम पूर्ण झाली. मोहिमे अंतर्गत तमिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यांच्या एकूण १६ शहरांमध्ये सायकलद्वारे प्रवास केला. प्रवासामार्गात येणाऱ्या शाळा, कार्यालयांमध्ये सागर यांनी ‘माती वाचवा’ हा संदेश दिला.

message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagar
message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagarsakal

या मोहिमेबाबत सागर याने सांगितले, ‘‘संयुक्त राष्ट्र, यूएनसीसीडी, वर्ल्ड फूड प्रोग्रॅम, यूएनएफएओ सारख्या जागतिक संस्थांच्या माहितीनुसार पुढील ४० ते ५० वर्षेच शेतीचे भविष्य आहे. मातीची सुपीकता कमी झाली असून कृषी उत्पादनासाठी हे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे यावर आताच काम केले तर ही स्थिती पुन्हा सामान्यांवर आणणे शक्य होईल. त्यासाठी ईशा फाउंडेशनचे सद्गुरू (जगदीश वासुदेव) वयाच्या ६५ व्या वर्षी देखील २७ राष्ट्रांमध्ये बाईक रायडींग करत लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेत या सायकल मोहिमेची कल्पना सुचली. हा सामाजिक प्रयत्न प्रत्येक व्यक्तीच्या योगदानातून पूर्ण होईल. हाच विश्‍वास मनात घेऊन हा उपक्रम पार पाडला.’’

message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagar
message Save the Soil through cycle campaign Soil conservation Sagar Gonnagarsakal

१०० दिवस चालणार मोहीम :

मार्च २३ ला सुरू झालेली ही मोहीम पुढील १०० दिवस चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत #सेव्ह सॉइल (save soil) ही मोहीम समाज माध्यमावर सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून सद्गुरू २७ राष्ट्रांमध्ये बाईक रायडींग करीत आहेत. ही कोणती मोहीम नसून आपली पृथ्वी वाचविण्याचा प्रश्‍न आहे. त्यामुळे अन्नाचा प्रत्येक कण खाताना मातीच्या संवर्धानाचा विचार व्हायला हवा, असे सागर याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.