पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील मिळकतकराची थकबाकी आणि अनधिकृत बांधकामावरील तिप्पट कर वसुलीला स्थगिती दिली होती. पण आता या निर्णयास सहा महिने झाले तरीही अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना थकीत रक्कमेसह कर भरण्यासाठी पाठपुरावा सुरु झाल्याने ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहेत. या वर्षाभरात ३१६.८८ कोटी रुपयांचा कर संकलित झाला आहे. तर एकूण थकबाकीही १७८३ कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे.