Pune Metro : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारणार

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) मेट्रोचे जाळे विस्तारण्याची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे.
Pune Metro
Pune MetroSakal
Updated on

पुणे - पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) मेट्रोचे जाळे विस्तारण्याची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे. यासाठी नवीन चार मार्गांवर मेट्रो प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी महामेट्रोने पीएमआरडीएला केली आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, वनाज ते रामटेकडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या तीन मार्गांचे काम सध्या सुरू असून, आता पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या चार मेट्रो प्रकल्पांची शिफारस करण्यात आली आहे. स्वारगेट ते खडकवासलादरम्यान नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), वारजे ते स्वारगेट, वाघोली ते पवार वस्ती (हिंजवडी) आणि चांदणी चौक ते हिंजवडी असे मार्ग आहेत.

त्यासाठी पीएमआरडीएने करून घेतलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील मार्गांची माहिती महामेट्रोने मागविली आहे. या माहितीच्या अधारे प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गांचे सर्वेक्षण करून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. पीएमआरडीएने सुमारे सात हजार २०० चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे काम ‘एल ॲण्ड टी’ कंपनीकडून करून घेतले. त्यामध्ये मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, रिंगरेल आणि बीआरटी, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, नवीन बस डेपो, रेल्वे स्टेशनचे अद्ययावतीकरण, नवीन रस्ते विकसित करणे या मोठ्या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे ५४ हजार ६०१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस प्राधिकरणाला केली आहे.

Pune Metro
शहरीकरण आणि सोशल मीडियाच्या जमान्यात लोककला लोप पावतेय का?

मेट्रोसाठी आवश्‍यक प्रवासीसंख्या नसल्याने त्यापेक्षा कमी खर्चामध्ये हे पर्याय प्रस्तावित केले आहेत. मेट्रो आणि लाईट मेट्रो असे मिळून सुमारे १९५ किलोमीटर लांबीचे मेट्रो प्रकल्पाचे जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. तर या मार्गाचे लोणीकाळभोर आणि सासवडपर्यंत विस्तारीकरणाचे काम देखील पीएमआरडीएकडेच देण्यात आले आहे. मात्र, उर्वरित प्रस्तावित मेट्रो मार्ग विकसित करण्याची जबाबदारी यापूर्वीच महामेट्रोकडे देण्यात आली आहे.

‘एलएनटी’च्या अहवालातील प्रकल्प

  • मोनो रेल, लाइट रेल, रिंगरेल आणि बीआरटी, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, नवीन बस डेपो, रेल्वे स्टेशनचे अद्ययावतीकरण, नवीन रस्ते विकसित करणे.

काम सुरू असलेले मार्ग...

  • पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट

  • वनाज ते रामटेकडी (महामेट्रोकडून)

  • हिंजवडी ते शिवाजीनगर (महामेट्रोकडून)

Pune Metro
कोरोना महामारीमध्ये मानसिक आधार ठरला महत्त्वाचा

प्रस्तावित मेट्रो मार्ग...

  • स्वारगेट ते खडकवासला (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता)

  • वारजे ते स्वारगेट

  • वाघोली ते पवार वस्ती (हिंजवडी)

  • चांदणी चौक ते हिंजवडी

प्रस्तावित मार्गांचे होणार सर्वेक्षण

प्रस्तावित मेट्रो मार्गांचे सर्वेक्षण करण्यासाठी आवश्‍यक माहिती आणि परवानगी महामेट्रोने पीएमआरडीएकडे मागितली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कार्यकारी संचालक पी. के. आचार्य यांनी त्यासंदर्भात पीएमआरडीएला पत्र पाठविले आहे. ‘एल ॲण्ड टी’च्या अहवालात प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गांचे सर्वेक्षण महामेट्रोकडून केले जाणार आहे. त्यानंतर हे मार्ग व्यवहार्य आहे की नाही, हे तपासून त्यानंतर त्या मार्गांबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.