पुणे : लॉकडाउनच्या काळात शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कामे करण्यास दोन्ही महापालिकांनी महामेट्रोला परवानगी दिली आहे. तसेच मनुष्यबळाचीही गाडी रूळावर येऊ लागली आहे. दरम्यान, भुयारी मेट्रोने एक किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.
कोरोनामुळे पुण्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये दोन्ही महापालिकांनी महामेट्रोला कामे करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी महामेट्रो मजुरांची बसमधून वाहतूक करीत आहे. तसेच मेट्रोकडील मनुष्यबळ 2600 पैकी 880 पर्यंत खालावले होते. आता ते 1500 पेक्षा जास्त झाले आहे. दर आठवड्याला सध्या सुमारे 100 मजुरांची भर पडत आहे, अशी माहिती महामेट्रोचे महासंचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मेट्रोकडून रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन बोगदे खोदण्यात येत आहे. एका बोगद्याचे काम 1 किलोमीटरपेक्षा जास्त झाले तर, दुसरा बोगदा सुमारे 700 मीटर लांबवर खोदण्यात आला आहे. त्यासाठी सध्या दोन टनेल बोअरींग मशीन कार्यरत आहेत. तसेच मनुष्यबळ उपलब्ध होत असल्यामुळे पिंपरी चिंचवड - स्वारगेट आणि वनाज- रामवाडी मार्गावरील पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱया मेट्रो मार्गासाठी स्थानकांचे काम पूर्ण करण्यासाठी सध्या भर देण्यात येत आहे, असेही सोनवणे यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोने मजुरांच्या काळजीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मेट्रोच्या मजुरांसाठी शहरात 16 लेबर कॅंप आहेत. प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स तैनात करण्यात आले आहेत. तसेच गरजेनुसार लेबर कॅंपमध्येच मजुरांची आरोग्य तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोरोनाची लागन होऊन बरे झालेले 22 कामगार आता कामावर रुजू झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.