Pune: Mhada तर्फे हजारो घरांची लॉटरी; अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू

याबाबत गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली.
mhada
mhadasakal
Updated on

पुणे म्हाडातर्फे ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे मागच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये कोरोनाची परिस्थिती असताना देखील अनेक ठिकाणी पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई या ठिकाणी मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं काम म्हाडामार्फत झालं. याबाबत गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली. (Mhada has started online application registration in pune)

mhada
Ashadhi Wari : पुण्यनगरीच्या सेवेने सुखावले वारकरी

पुण्यात प्रामुख्याने येरवडा, कसबा पेठ, महंमदवाडी, केशवनगर, मुढंवा, बाणेर, वाघोली, फुरसुंगी, लोहगाव, वाघोली, पाषण खराडी, वाकड, थेरगाव, वडमुखवाडी, ताथवडे, किवळे, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि पुनावळे या भागात म्हाडा या ४,७४४ घरांची सोडत काढणार.

mhada
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्‍वर...

जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले होते. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे

mhada
Ashadhi Wari : पुण्यात भरला वैष्णवांचा मेळा

किती व कोठे आहेत सदनिका-
सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत एकूण १९४५ सदनिकांचा सोडतीत समावेश असून पुणे महापालिकेच्या हद्दीत ५७५ सदनिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत १३७० सदनिका, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत २७९ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील १७० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील दोन हजार ६७५ सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

mhada
पुणे : विमानांसमोर अडथळा लँडिंगचा

म्हाडा योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, ज्याला म्हाडा देखील म्हणतात, याद्वारे गृहनिर्माण योजना राबविण्यात आल्या आहेत ज्या महाराष्ट्रातील रहिवाशांना राज्यात परवडणारी घरे खरेदी करण्याची संधी देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()