Mhada News : घरांच्या विक्रीतून ‘म्हाडा’ला ‘लॉटरी’ ; सोडतीतून एक हजार ३९१ कोटी जमा

सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणालाच (म्हाडा) ‘लॉटरी’ लागली आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून तब्बल एक हजार ३९१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
Mhada News
Mhada Newssakal
Updated on

मुंबई : सोडतीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणालाच (म्हाडा) ‘लॉटरी’ लागली आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाला घरांच्या विक्रीतून तब्बल एक हजार ३९१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे ‘म्हाडा’ तिजोरी भरली आहे.

मुंबईतील घरांच्या सोडतीपूर्वी ऑगस्ट २०२३ पर्यंत ‘म्हाडा’च्या तिजोरीत केवळ १५० ते २०० कोटी रुपयांचा निधी शिल्लक होता. आता त्यात एक हजार ३९१ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशी ‘म्हाडा’ची विविध मंडळे आहेत. त्यांच्याकडून तयार घरांबरोबरच भूखंडाची विक्री सोडत पद्धतीने केली जाते.

‘म्हाडा’ला सर्वाधिक महसूल हा मुंबईतील घरांच्या विक्रीतून मिळतो. मुंबई मंडळाने जुलै २०२३ मध्ये गोरेगाव, विक्रोळी, अंधेरी जुहू, कांदिवली, बोरिवली आणि शीव येथील चार हजार ८२ घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्याची सोडत १४ ऑगस्टला सोडत काढण्यात आली.

Mhada News
Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्राचे एप्रिलपासून सायं प्रसारण

दुकाने, भूखंडांच्या विक्रीतून ५०० कोटी

मुंबई मंडळातर्फे १७३ दुकाने आणि १७ भूखंडाच्या विक्रीसाठी ई-लिलाव करण्यात येणार आहे. दुकानांच्या विक्रीतून सुमारे २०० कोटी तर भूखंडाच्या विक्रीतून सुमारे ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘म्हाडा’च्या तिजोरीतील खडखडाट संपणार आहे.

‘म्हाडा’च्या तिजोरीत (कोटी रुपयांत)

१५० ते २००

ऑगस्ट २०२३ पर्यंत

१,३९१

ऑक्टोबर २०२३ नंतर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.