पुणे - पोलिस नक्षलवादी चकमकीत देशातला मोठा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचे बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवादाबद्दल सहानुभुती बाळगणा-यांना संघटीत करण्याचे काम करण्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होता.
छत्तीसगडमध्ये शरण आलेला गडचिरोलीतील वरिष्ठ माओवादी नेता पहाडसिंग याचा एल्गार आणि भीमा - कोरेगाव प्रकरणात पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये त्याने भूमिगत नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास उर्फ दिपक, उर्फ एम हा देशभरात नक्षलवादाबद्दल सहानुभुती बाळगणा-यांचे जाळे सांभाळत आहे. तसेच दलित संघटनांना चळवळीत सहभागी होण्याकरिता प्रेरित करतो, असे त्याने सांगितले होते. त्याची काम करण्याची पद्धतीने त्याने न्यायालयास सांगितले होती.
अरुण भेलके हा मिलिंद तेलतुंबडे सोबत माओवादी चळवळीत सक्रीय होता. नक्षलवादाबद्दल सहानुभुती बाळगणा-यामध्ये माओवादी चळवळ पसरविण्याचे काम अरुण व त्याची पत्नी करीत. जंगलात त्याची व आपली तेलतुंबडेच्या उपस्थित भेट व चर्चा झाली आहे, अशी साक्ष शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने पुण्यातील विशेष न्यायालयासमोर दिली.
दोरपटे हा गडचिरोली येथील शरणागत नक्षलवादी आहे. माओवादाच्या गुन्ह्यात अटक अरुण भेलके प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर त्याची साक्ष झाली होती. मी नक्षल दलामध्ये सक्रिय असताना जंगलात दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेची भेट झाली. तेव्हा त्यासोबत शहरी भागात काम करणारे जानकी, समर व अन्य काही जण सोबत होते, असेही कृष्णाने न्यायालयात सांगितले होते.
अरुण भेलके मिलिंद तेलतुंबडेसोबत असत
बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या संघटनेचा सक्रिय सदस्य अरुण भेलके हा मिलिंद तेलतुंबडे यांच्यासोबत असायचा. तर त्याची पत्नी कांचन भेलके ही नक्षल भागातील संघटनेच्या सदस्यांना औषध उपचाराचे काम करायची, अशी माहिती गडचिरोली येथील शरणागत नक्षलवादी गोपी याने यापुर्वी न्यायालयात दिली. गोपी हा शरण आल्यापासून पोलिसांच्या ताब्यात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.