उंडवडी - पावसाने ओढ दिल्याने बारामती तालुक्याच्या जिरायती भागात ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खराडेवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी सतीश काकडे यांनी दररोज ३०० लिटर दुधाचे उत्पादन करून आधुनिक दुग्धोत्पादन व्यवसायात भरारी घेतली आहे. पशुधनासाठी मूरघास व पाण्यासाठी काटेकोर नियोजनाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादित केले आहे.
काकडे यांनी २१ गाईंच्या दुधासाठी मशिन घेतले आहे. हे दूध, गोविंद डेअरीला जात असून प्रती लिटरला ३३ रुपये पर्यंत बाजारभाव मिळतो. काकडे यांच्याकडे १२ एकर जमीन आहे. त्यांनी जमिनीत तब्बल दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे. ते गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात तुडूंब भरले होते.
आजदेखील शेततळ्यात अर्ध्यापर्यंत पाणी शिल्लक आहे. काकडे शेतात दर वर्षी जनावरांसाठी चारा, पिके व ऊस, ज्वारी, बाजरी व गहू अशी पिके घेतात. काकडे यांनी शेतीच्या जोडीला पूरक ठरत असलेला दुग्ध व्यवसाय आधुनिक पद्धतीने सुरू केला आहे.
दरम्यान, काकडे यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत व त्यामध्ये स्वतःचे पैसे टाकून दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे. या शेततळ्यात आजही तब्बल ७५ लाख लिटर पाणी उपलब्ध आहे.
मुक्तसंचार गोठ्याची निर्मिती
काकडे यांच्याकडे लहान-मोठी २१ पशुधन असून, त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी मुक्तसंचार पद्धतीचा गोठा उभारला आहे. गोठ्यात गाई मोकळ्या राहिल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मुक्तसंचार गोठ्यातील गाई गरज असेल, तेव्हा चारा व पाणी स्वतःहून खातात. त्यामुळे कमी मनुष्य बळावरदेखील नियोजन करणे काकडे पती-पत्नीस सोपे झाले आहे.
मूरघासामुळे चाऱ्याचा प्रश्न मिटला
सध्या सर्वत्र वैरण, कडबा, मका, कडवळ ऊस या सारख्या पिकांची पाऊस नसल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, काकडे यांनी मार्च महिन्यात शेतातील शिल्लक मका कापून त्याचा मूरघास तयार करून ठेवला आहे. यामध्ये बंकर पद्धतीचे दोन खड्डे केले. यात तब्बल ६० ते ७० टन मूरघास बंदिस्त करण्यात होता. यापैकी एका खड्ड्यात ४० ते ५० टन मूरघास (चारा) शिल्लक आहे.
दररोज एका गाईला २० किलोप्रमाणे २१ गाईंना ४२० किलो मूरघास
पिण्यासाठी व धुण्यासाठी महिन्याला सुमारे एक लाख लिटर पाणी
नियोजनबद्धतेच्या जोरावर दिवसभर गाईंच्या गोठ्यातील चारा-पाणी, गोठा व गाई धुणे, अशी सर्व कामे वेळेत करतो. मुक्तसंचार गोठ्यातील स्वच्छता आणि दूध काढणे असते. ते वेळेत होणे गरजेचे असते. तसेच आम्ही शेतातून हिरवा चारा म्हणजे मका व ऊस कापणी करत त्याची कुट्टी करून गाईंना घालतो.
- शीतल सतीश काकडे, दूध उत्पादक
२ लाख ९७ हजार रुपये - प्रतिलिटर ३३ रुपये
४४, १०० किलो - महिन्याचा चारा (मूरघास)
१ लाख २४ हजार ७४० - पशुखाद्य
१ लाख १८ हजार रुपये - निव्वळ नफा
१० कालवडी - वर्षाला सरासरी
७ हजार रुपये (दरमहा) - शेणखताचे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.