अनुदानासाठी जिल्ह्यातील ११४ दूध प्रकल्पापैकी अवघ्या ४ दूध प्रकल्पांचे अनुदानासाठी प्रस्ताव दाखल झाले असल्याची बातमी ५ सप्टेंबर रोजी सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारलाही जाग आली.
निरगुडसर : पुणे जिल्ह्यातील दूध प्रकल्पांकडून (Milk Project) अनुदानाचे प्रस्ताव सादर होत नसल्याने दुधाचे अनुदान रखडले, दोन महिने उलटले तरी एकही शेतकऱ्याला (Farmers) दुधाचे अनुदान मिळाले नाही, शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान मिळणार कधी? या आशयाची बातमी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.