जरंडेश्वर कारखान्यावर कारवाईप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar
Ajit PawarSAKAL
Updated on
Summary

इडीने जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केली होती. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयाचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. अजित पवार यांनी याप्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे- इडीने जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केली होती. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयाचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. अजित पवार यांनी याप्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे. जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नाही, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच विक्री झाली आहे. याप्रकरणी अनेकदा चौकशा झाल्या. चौकशी करा पण चौकशीत पारदर्शकता असावी. सीबीआय चौकशीमागील गौडबंगाल काय आहे याची माहिती जनतेला आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. (minister ajit pawar said about ed action on jarandeshwar factory)

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्ज थकवणाऱ्या 14 कारखान्याची विक्री करण्यात आली. त्यात जरंडेश्वर साखर कारखाना सुद्धा होता. कारखाना घेण्यासाठी 12 ते 15 कंपन्यांनी टेंडर भरले होते. पण, त्यात सर्वात जास्त टेंडर गुरु कमोडिटी मुंबई या कंपनीने भरले. त्यांची बोली 65 कोटी 75 लाखांची होती, त्यांना तो कारखाना विकण्यात आला. इतर कारखानेही इतर कंपन्यांनी विकत घेतले. जो कारखाना गुरु कंपनीने घेतला होता तो बीव्हीजी ग्रुपचे हणमंत गायकवाड यांनी चालवायला घेतला. त्यांना पहिल्या वर्षामध्ये 5 कोटीचा तोटा झाला. त्यामुळे ते बँकफूटवर गेले. त्यानंतर ती कंपनी माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी चालवायला घेतली. पुढचे दोन-तीन वर्ष तोटाच झाला. त्यामुळे त्यांनी काही बँकाची चर्चा करुन, रितसर परावानगी घेऊन कारखान्याची क्षमता वाढवली. पण, कारखाना गुरु कमोडिटीच्या नावाने असल्याने ईडीने त्यावर टाच आणली. गुरु कमोडिटीवर ईडीने का टाच आणली याची मला माहिती नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.

Ajit Pawar
'जॉन्सन अँड जॉन्सन' लशीचा एक डोस डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी

एखाद्या एजेन्सीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याआधी अनेक तक्रारी झाल्या, सीआयडी, अँटी करप्शन ब्युरोने चौकशा केल्या पण त्यातून काही निष्पण झालं नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी ज्याच्याकडे अपिल करायची आहे, त्याच्याकडे करेल. अनेकांचे जीवन या कारखान्यावर अवलंबून आहे. सर्व प्रकारच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. कारखाना विक्री संचालक बोर्डाने केली नाही, तर उच्च न्यायलायच्या निर्देशानुसार विक्री करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काय राजकारण सुरु आहे, ते सर्वांना माहिती आहे. त्याच्या मागचं कारण कळायला मार्ग नाही. पण, शेवटी न्याय मिळतो. माझ्या माहितीनुसार, सर्वात जास्त किंमतीने जरंडेश्वर कारखाना विकण्यात आला, असं अजित पवार म्हणाले. घोटाळा काय झाला ते दाखवा ना. उद्या मी भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यास घोटाळा झाला म्हणायचं का? असा सवालही अजित पवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.