कार्यक्रमात उदघाटन न करताच मंत्रीमहोदय गेले निघून

त्यानंतर तेथे आलेल्या जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते हा उदघाटन समारंभ झाला.
abdul sattar
abdul sattarsakal
Updated on

आळेफाटा : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे (ता.२७) आयोजित 'ग्रामसंसद' या ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी, महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या घटक पक्षांत विकासकामांच्या श्रेयवादावरून धुसफूस सुरु असल्याचा प्रत्यय राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही आला. दरम्यान यावेळी मंत्रीमहोदय उदघाटन न करताच तेथून निघून गेले आणि त्यानंतर तेथे आलेल्या जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते हा उदघाटन समारंभ झाला.

abdul sattar
VIDEO: कणकवलीत नारायण राणेंना बसला शॉक

जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षात विकासकामांच्या श्रेयवादावरून बऱ्याचदा धुसफूस सुरु असते. 'पारगाव तर्फे आळे' येथे (ता.२७) सायंकाळी सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते 'ग्रामसंसद' या ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीच्या उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन झाल्यावर, सर्वप्रथम त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखा कार्यालयाचे उदघाटन झाले.

त्यानंतर येथील 'ग्रामसंसद' या ग्रामसचिवालय इमारतीचा उदघाटन समारंभ होणार होता. या समारंभासाठीच्या व्यासपीठावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी आमदार शरद सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे,देवदत्त निकम जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,शरद लेंडे, माऊली खंडागळे,गणपतराव फुलवडे,विशाल तांबे,बाळासाहेब खिल्लारी,शिवाजी चव्हाण, सरपंच लताताई चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

abdul sattar
महाराष्ट्रातील भाजपा नेते मोदी सरकारचं ऐकत नाहीयत - काँग्रेस

दरम्यान या कार्यक्रमासाठी सर्वजण जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होते. यावेळी आमदार अतुल बेनके आल्यावर उदघाटन होणार असल्याचे गृहीत धरून कार्यक्रम सुरु करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शिवाजीराव चव्हाण हे माईकवर बोलत असताना अचानक माईक बंद झाला. दरम्यान माईक बंद करा असे कुणीतरी सांगितले असल्याने, यावेळी माईक बंद झाल्याची चर्चा सुरु झाली. यावेळी मंत्रीमहोदय महोदय म्हणाले की तुम्हाला अडचण असेल तर मी जातो असे म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार कार्यक्रमातून निघून गेले .

यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके यांनी कार्यक्रमास येण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. दरम्यान यामध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची, माजी खासदारांची त्यांच्या नेते मंडळींची अजिबात चूक नाही. त्यांचा अवमान गावाने केलेला नाही तर त्यांचा अवमान त्यांच्याच पक्षाच्या (शिवसेना) कार्यकर्त्यांनी केला असल्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले.

abdul sattar
देशाला हादरवणाऱ्या म्हैसूर बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक

माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले,या गावात जो काय प्रकार घडला आहे तो चांगला नाही मंत्र्यांच्या कार्यक्रमात माईक बंद करणे हा त्यांचा अपमान नसुन हा अपमान जुन्नर तालुक्यातील जनतेचा आहे. सभा सुरू झाल्यानंतर पहिल्या भाषणाच्या वेळी दोन ते तीन वेळा माईक बंद करण्यात आला. यामुळे व्यासपीठा- वरील काही मान्यवरांनी स्पिकर ऑपरेटला विचारले माईक का बंद करता तेव्हा त्याने सांगीतले की मला फोन आला होता माईक बंद कर म्हणुन मी बंद केला.त्यामुळे मंत्री महोदय म्हणाले माझ्यामुळे अडचण होत असेल तर मी निघुन जातो व ते निघुन गेले .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()