येरवड्यात तीन मुलांनी मिळून अल्पवयीन मुलास पट्ट्याने मारहाण केल्याने तिघांनाही येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे येरवडा भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विश्रांतवाडी - येरवड्यात (Yerwada) तीन मुलांनी (Children) मिळून अल्पवयीन मुलास (Minor Boy) पट्ट्याने मारहाण (Belt Beating) केल्याने तिघांनाही येरवडा पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असून या घटनेमुळे येरवडा भागातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
येरवडा येथील अनुसयाबाई सावंत शाळेच्या मैदानावर दुपारी शाळा सुटल्यावर हा प्रकार घडला. यावेळी तेथे अनेक मुले क्रिकेट खेळत होती. शाळेत खेळायला आलेल्या बाहेरच्या मुलांनी ही मारहाण केली. यात ज्याला मारहाण झाली तो आठवीतील तेरा वर्षांचा विद्यार्थी आहे. त्याच्यावर कबुतरे चोरल्याचा आराोप करीत तीन मुलांनी ही मारहाण केली. यावेळी अंगातील कपडे काढायला लावून पट्ट्याने मारहाण केली. मुलगा मी कबुतरे चोरली नसल्याचे सांगत असूनही न ऐकता अमानुषपणे मारहाण केली. विशेष म्हणजे या घटनेचा विडिओ त्यांनी स्वतःच काढून तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला.
संबंधित मारहाण झालेला मुलगा बिडी कामगार वसाहतीत राहत असून मारहाण करणारेदेखील त्याच परिसरात राहत असून तिघांनी मिळून या मुलास गाठून बॅट व पट्ट्याने बेदम मारहाण केल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. ज्यावेळेस या मुलांना पर्णकुटी पोलीस चौकीत आणण्यात आले त्यादरम्यान चौकीबाहेर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलाच्या आईवडिलांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन मुले अल्पवयीन असून एक मुलगा मोठा आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन दोघांना बालन्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनुस शेख यांनी दिली आहे.
शहराचे प्रवेशद्वार म्हणून येरवडा उपनगर भागाकडे जरी पहिले जात असले तरी पण या भागात मोठ्या प्रमाणात राज्यासह परराज्यातील नागरिक स्थायिक झाले असून असणारा भाग हा बहुतांश प्रमाणात झोपडपट्टी भाग आहे. यापूर्वी परिसराला गुन्हेगारीचा भाग म्हणून या भागाची ओळख होती. मात्र मध्यंतरीच्या काळात खाजगी कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे येरवड्याची असणारी गुन्हेगारीची ओळख नष्ट झाली होती. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याने शिक्षण घ्यायच्या वयात अनेक अल्पवयीन मुले वाममार्गाला लागून व्यसनाधीन झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.