'गुड टच अँड बॅड टच' ची कार्यशाळा सुरू होती, तरुणीनं असं काही सांगितलं की पोलिसांना बोलवावं लागलं, काय घडलं?

Pune Crime: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चार तरूणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Rape
Rapeesakal
Updated on

पुण्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कॉलेजमध्ये सुरू असलेल्या 'गुड टच ॲण्ड बॅड टच' कार्यशाळेदरम्यान कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन दिवसांपूर्वी चार मुलांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी पॉक्सोवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून शाळा- महाविद्यालयांमध्ये ‘गुड टच, बॅड टच’बाबत उपक्रम राबविण्यात येत आहेत. एका महाविद्यालयात महिला पोलिस अधिकारी ‘गुड टच, बॅड टच’बाबत मार्गदर्शन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एका मुलीचे समुपदेशन करण्यात येत होते. त्यावेळी या मुलीने तिच्या अल्पवयीन मैत्रिणीसमवेत वाईट प्रकार घडत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या पीडित मुलीला विश्वासात घेत चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित महाविद्यालयात शिकते. दोन आरोपीही इयत्ता 11वी आणि 12वीत शिकत आहेत. चार आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत. पुणे पोलिसांनी पोक्सो कायदा आणि बीएनएसच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात गुड टच आणि बॅड टच या विषयावर कार्यशाळा सुरू होती. यादरम्यान एका विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीसोबत काही दिवसांपूर्वी घडलेली घटना सांगितली.

Rape
Thane Crime News: पोलिस ठाण्यात येऊन महिला पोलिस कर्मचाऱ्यावर ब्लेडने हल्ला; विठ्ठलवाडी ठाण्यात नेमकं काय घडलं?

मैत्रिणीसोबत घडलेली घटना ऐकून शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना बोलावून घटनेची संपूर्ण माहिती दिली. ही बाब पीडित मुलीच्या पालकांना कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पीडितेने सांगितले की, चार मुलांनी तिच्याशी गैरवर्तन केले आहे. यातील एक मुलगा तिच्या कॉलेजचा आहे. पीडित मुलीची सोशल मीडियावर आरोपींशी ओळख झाली. त्यानंतर दोन अल्पवयीन मुलांसह चौघांनी तिच्याशी लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले.

मागील एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी घडला. या चारही आरोपींचा एकमेकांशी काही संबंध नाही. ते वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकत असल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना ऐकताच शिक्षकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तरुणीच्या घरच्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून, अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.