Chandrakant Patil: अजित पवारांविरुद्ध भाजपमध्ये नाराजी? चलाख व धूर्त म्हणत चंद्रकांत पाटलांची तुफान फटकेबाजी

पवार कुटुंब धुर्त म्हणत अजित पवारांवर केला हल्लाबोल
Dada VS Dada
Dada VS DadaEsakal
Updated on

दिवाळी पाडव्यानिमीत्त बारामतीतल्या गोविंदबाग येथे शरद पवारांना भेटण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते, नेते, लोक आले होते. दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग या ठिकाणी पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. सकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर होते. मात्र, अजित पवार संध्याकाळी सहकुटुंब शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी गोविंदबागेत दाखल झाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पवार कुटुंब धूर्त असल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा 'दादा विरूध्द दादा' हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजित पवार राजकीय दृष्ट्या अतिशिय चतुर, चलाख आणि धूर्त आहेत. 'ते पोटात काय आहे ते ओठावर येऊ देत नाहीत', असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार दिवाळी स्नेह भोजनासाठी गोविंद बागेत शरद पवारांच्या घरी गेले. त्यावर वाडेश्वर कट्टयावर चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला असता, पवार कुटुंब धूर्त असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. यासंबधीचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

Dada VS Dada
Mumbai : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जास्त लक्ष घातले तर यु टाईप रस्ताचे काम लवकर होईल - गणपत गायकवाड

पुण्यात अनेकदा दादा विरूध्द दादा असा सामना दिसून येतो. आजही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी गोविंद बागेत स्नेहभोजनाला सहकुटुंब लावली हजेरी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर दिवाळीला पवार कुटुंब एकत्र येणार का याची उत्सुकता लागली होती. दिवाळी पाडव्याच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेत गैरहजर होते. त्यानंतर अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, सायंकाळी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत दाखल झाले.

अजित पवार संध्याकाळी सहकुटुंब शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी गोविंदबागेत दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या समवेत पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, जय पवारही उपस्थित होते.

Dada VS Dada
Amravati Loksabha : शरद पवार गट अमरावती लोकसभा मतदारसंघ सोडणार? हे आहे कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.