न्यायालयाची दिशाभूल; नितीन लांडगेंची येरवड्यात रवानगी

नितीन लांडगे यांनी जामीन मिळण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
nitin landge
nitin landge
Updated on

पुणे : होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (nitin landge) यांनी जामीन मिळण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

nitin landge
पुणे : मानव वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय समितीची बैठक संपन्न

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी लाडगेंचा जामीन अर्ज फेटाळत त्यांची गुरुवारी (ता. २६) येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.लांडगे यांनी तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी न्यायालयाला आज्जीचे (आईची आई ) निधन झाले असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे. त्यांनी खोटी माहिती देत न्यायालयाची दिशाभूल केल्याचे सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

आज्जीचे निधन झाल्याने तिच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमास जायचे आहे, असे कारण सांगून लांडगे यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करीत २६ आॅगस्टपर्यंत जामीन देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात लांडगे यांच्या आज्जी नाही तर वडिलांच्या मावशीचे निधन झाले आहे, अशी माहिती ॲड. घोरपडे यांनी न्यायालयात दिली.

nitin landge
पुण्यात म्हशीच्या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी; पाहा व्हिडिओ

लांडगे यांना जामीन मंजूर झाल्यास ते फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दबाव येण्याची दाट शक्यता आहे. तपासात उल्लेख झालेले ते १६ जण म्हणजेच स्थायी समितीचे १६ सदस्य असून, त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. तसेच त्यांच्यात आणि अटक आरोपी यांचे रॅकेट आहे का? याबाबत तपास करणे बाकी आहे. त्यामुळे लांडगे यांचा जामीन फेटाळून लावण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. घोरपडे यांनी केला.

शुक्रवारी जामीनावर सुनावणी :

लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपार्इ अरविंद भीमराव कांबळे (रा. भीमनगर पिंपरी), संगणक आॅपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (रा. थेरगाव वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया (रा. धर्मराजनगर) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जांवर शुक्रवारी (ता. २७) सुनावणी होणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सीमा मेहेंदळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.