Dikshant Samarambh : विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे सोमवारी (ता. २३) आयोजित सातव्या दीक्षांत समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते.
mit adt university Dikshant Samarambh
mit adt university Dikshant Samarambhsakal
Updated on

पुणे - ‘विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. दुसऱ्यांच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा आणि तत्त्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास यश नक्कीच मिळते. युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी करिअर करावे,’ असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे सोमवारी (ता. २३) आयोजित सातव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. एम. शंकरन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, ज्योती ढाकणे-कराड, डॉ. विनायक घैसास, डॉ. सुचित्रा नागरे, प्र.कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण उपस्थित होते.

राधाकृष्णन म्हणाले, ‘अध्यात्माचा संबंध हा प्रत्येकाच्या जीवनाशी असतो. आर्थिक प्रगतीसाठी मानवाची सांस्कृतिक प्रगतीही तितकीच महत्त्वाची असते. विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातूनच आपण गरिबी दूर करू शकतो. मूल्याधिष्ठित व संस्कृतीची जाण असणारे विद्यार्थी घडविण्याचे काम एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून घडत आहे.’

प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी विद्यापीठाने वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा अहवाल मांडला. ते म्हणाले, ‘यंदाचा सातवा दीक्षांत समारंभ 'एमआयटी एडीटी'साठी विशेषार्थाने गौरवाचा दिवस आहे. 'एमआयटी एडीटी'ने ने परीक्षेसाठी संपूर्ण डिजिटल प्रणाली अवलंबली असून, पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची ओळख बनली आहे.’

या वेळी विद्यापीठातील २२ पीएच.डी., ५३ सुवर्णपदके व १९४ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र यांसह एकूण दोन हजार ९७२ विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी बहाल करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर व प्रा. स्वप्नील शिरसाठ यांनी केले.

एमआयटी एडीटीकडून चांगले विद्यार्थी घडविण्यासह अध्यात्म व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी देशाच्या उज्वल भविष्यात अनमोल योगदान द्यावे.

- प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक अध्यक्ष, माईर्स एमआयटी शिक्षण समूह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.