एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त डॉ. सुरेश घैसास यांचे निधन

माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त आणि माजी अध्यक्ष डॉ. सुरेश गोविंद घैसास (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन
MIT Dr Suresh Ghaisas passed away pune
MIT Dr Suresh Ghaisas passed away pune sakal
Updated on

पुणे : माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त आणि माजी अध्यक्ष डॉ. सुरेश गोविंद घैसास (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले व नातवंडे असा परिवार आहे.डॉ. घैसास यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले असून, बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख होते. त्यांनी धोंडूमामा साठे वैद्यकीय महाविद्यालयात कान, नाक, घसा विभागाचे प्रोफेसर होते. ते महाराष्ट्र कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांच्या असोसिएशनचे अध्यक्ष होते.

माईर्स एमआयटीच्या लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. माईर्स एमआयटी संस्थेला १६ एकर जमीन मोबदला न घेता सुपूर्त केली. त्यांच्या या योगदानामुळे माईर्स एमआयटी शिक्षण संस्था नावलौकिकास आली आहे.

चेहऱ्यावर सदैव हास्य ठेवून ते निरपेक्ष व निर्मळ भावनेने आपले आयुष्य जगले. त्यांच्या अचानक जाण्याने संस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.

- डॉ. विश्‍वनाथ कराड, संस्थापक, माईर्स एमआयटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.