मिरचीपूड टाकून इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला; आमदार भरणेंकडून कठोर कारवाईचे पोलीस प्रशासनाला आदेश

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील (Indapur Tehsildar Shrikant Patil) यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय धक्कादायक आहे.
MLA Dattatraya Bharne Tahsildar Shrikant Patil Attack Indapur
MLA Dattatraya Bharne Tahsildar Shrikant Patil Attack Indapuresakal
Updated on
Summary

याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांना समजताच त्यांनी त्वरित तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील (Indapur Tehsildar Shrikant Patil) यांच्यावर झालेला हल्ला हा अतिशय धक्कादायक असून हल्लाखोरांवर ताबडतोब कठोर कारवाई करण्याच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

आज, शुक्रवार (ता. 24) सकाळी नेहमीप्रमाणे तहसीलदार श्रीकांत पाटील हे आपल्या शासकीय वाहनातून चालक मल्हारी मखरे यांच्यासह आपल्या कार्यालयाकडे जात असताना शहरातील संविधान चौकात अचानकपणे हल्लाखोरांनी त्यांच्यावर मिरचीपूड टाकून हल्ला केला. मात्र, सुदैवाने श्रीकांत पाटील आणि त्यांचे वाहनचालक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

MLA Dattatraya Bharne Tahsildar Shrikant Patil Attack Indapur
दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टरवरच काळाचा घाला; 108 रुग्णवाहिकेची ट्रकला मागून जोरदार धडक

याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांना समजताच त्यांनी त्वरित तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच याविषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की, श्रीकांत पाटील हे अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तालुक्यामध्ये परिचीत असून त्यांच्या प्रशासकीय कामकाजाविषयी जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

MLA Dattatraya Bharne Tahsildar Shrikant Patil Attack Indapur
12th Exam Result : आई-वडिलांचं छत्र नसताना स्वत: काम करून पठ्ठ्यानं 12 वी परीक्षेत मिळवले '35 टक्के'

मात्र, असे असताना त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे हे अतिशय धक्कादायक असून या हल्ल्याचा आमदार भरणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच ज्यांनी कोणी असा भ्याड हल्ला केला आहे‌. त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.