आमदार कुल यांनी जबाबदारीने बोलावे व वागावे : रमेश थोरात

दौंड शहरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रमेश थोरात यांनी हे मत व्यक्त केले.
रमेश थोरात
रमेश थोरात sakal
Updated on

दौंड : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी सत्तेचा गैरवापर केला. जिल्हा बॅंकेच्या दीडशे कोटी रूपयांच्या थकबाकीसह एकूण साडेपाचशे कोटी रूपयांची देणी देय असताना कारखाना सुरू करण्याच्या वल्गना करून सभासदांचा विश्वासघात करणे योग्य नाही. चेअरमन व आमदार म्हणून जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

दौंड शहरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रमेश थोरात यांनी हे मत व्यक्त केले. नोटरी अजित बलदोटा या वेळी उपस्थित होते. रमेश थोरात म्हणाले, "भीमा कारखान्यावर जिल्हा बॅंकेने १५० कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी जप्तीची कारवाई केली. पुरेशी संधी देऊन २११ एकर जागेसह तारण मालमत्ता जप्तीची ही कारवाई आहे. जप्ती नंतर परतफेडीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव आला तरी आता बॅंकेला मुदत द्यायचा अधिकार नाही."

रमेश थोरात
एकनाथ खडसेंना झटका! ईडीकडून जावयाची मालमत्ता जप्त

ते पुढे म्हणाले, "ज्यांच्या ताब्यात वीस वर्ष कारखाना आहे त्या कारखान्याला या पाच वर्षातच गळती का लागली ?, याची चौकशी झाली पाहिजे. जिथे जिथे खायला मिळतं ना तिथं खाल्याशिवाय सोडायचचं नाही, अशी त्यांची वृ्त्ती आहे, चोर्या मार्या करायला ते कोणाला एेकणार नाही. एवढे दरोडे घालून साजूक सारखे वागतात याचे वाईट वाटते. खाबूगिरीमुळे कारखाना बंद पडला आहे."

जानेवारी २०२० मध्ये कारखान्याच्या साखर गोदामातील बॅंकेकडे तारण असलेल्या साखर पोत्यांना लागलेल्या संशयास्पद आगीत साखर जळाली नाही तर जाळली गेली. आगीत ७०० पोती सुध्दा जळाली नाही पण आगीच्या नावाखाली पोती विकण्यात आली, असा आरोप रमेश थोरात यांनी केला.

रमेश थोरात
भाजपची जन आशीर्वाद यात्रा होणारच; राणे उद्या रत्नागिरीत

कारखान्यासाठी अजित पवार यांनी घेतली बैठक

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्जवसुलीसाठी पुणे येथील सर्किट हाउस मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बॅंकेचे संचालक अजित पवार, बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात व कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांची आठ महिन्यांपूर्वी बैठक झाली. राजकारण न करता संस्थेच्या हितासाठी न्यायालयीन प्रक्रिया व लिलाव करण्यापेक्षा मध्यम वर्गाने वसुली कशी करता येईल, याकरिता ही बैठक होती. राहुल कुल यांनी दोन महिन्यात सर्व करतो असे सांगितले परंतु प्रत्यक्षात थकबाकी दिली नाही, अशी माहिती रमेश थोरात यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()