छत्रपती संभाजी महाराजांच्या शासकीय जयंतीसाठी आवाज उठविणार

sanjay jagtap.jpg
sanjay jagtap.jpg
Updated on

गराडे (पुणे) : छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यामुळे येथे जयंती शासकीय जयंती साजरी करण्यासाठी विधानसभेत आपण आवाज उठवणार आहे, अशी ग्वाही आमदार संजय जगताप यांनी दिली.

पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, पुरंदर प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ आणि इतर संघटनांच्या माध्यमातून करण्यात येते. येथे शासकीय जयंतीही साजरी करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुरंदर शाखेच्या वतीने आमदार जगताप यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सासवड (ता. पुरंदर) येथे पुरंदर नागरी पतसंस्थेच्या सभागृहात तालुक्यातील विविध विषयांवर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

जिल्हा बँकेचे संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, माजी सदस्य सुदामराव इंगळे, हेमंत माहूरकर, मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदूकाका जगताप, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण आदी या वेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार जगताप म्हणाले की, पुरंदर किल्ल्यावरील संभाजी महाराज सभागृहाचे छत वादळी पावसाने उडून गेले असून, त्याच्या दुरुस्तीसंदर्भात शंभूभक्तांकडून मागणी होत आहे. परंतु, ही जागा लष्कराच्या ताब्यात असल्याने दुरुस्तीवर मर्यादा येत आहेत. याबाबत सर्वांशी चर्चा करून हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी सोळा एकरावरील शंभूसृष्टीचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. 

आमदार जगताप यांनी मांडलेले मुद्दे

  •  विमानतळ पुरंदरमध्ये होणार असून त्याच्या जागेत बदल होणार आहे. तांत्रिक अडचण लक्षात घेऊन पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
  •  गुंजवणीबाबत पुढील आठवड्यात खासदार सुप्रिया सुळे व जलसंपदामंत्री यांच्याशी चर्चा करणार.
  •  पुरंदर तालुक्यातील रस्ते व विविध विकास कामांसाठी साडेसहा कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, यामध्ये समाज मंदिराचा देखील समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.