NCP vs BJP: विधानसभेपर्यंत महायुती टिकणार का? अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव

Sunil Shelake Vs Bala Bhegade: मावळ भाजपच्या या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतील टिकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Maval Vidhan Sabha
Maval Vidhan SabhaEsakal
Updated on

येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. तर दुसरीकडे सर्वच पक्षातील ईच्छुक तयारीला लागले आहे. त्यामुळे मित्रपक्षातील हे ईच्छुक दावे-प्रतिदावे करत आहेत.

दरम्यान मावळचे भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना आतापासूनच विरोध करण्यास सुरूवात केली आहे. मावळमध्ये नकुत्याच झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात सुनील शेळके यांचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

मावळ भाजपच्या या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुतील टिकणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सांगली पॅटर्नचा उल्लेख

या कार्यक्रमात बोलताना बाळा भेगडे म्हणाले, "मावळ हा कालही आणि आजही भाजपचाच बालेकिल्ला आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला इथून लढायचे आहे. लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जनतेने दाखवून दिले आहे की, कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय घेतल्यास काय होते."

पुढे बाळा भेगडे यांनी राष्ट्रावदीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यावरही टीका करत, शेळके कलाकार आहेत अशी टीका केली.

Maval Vidhan Sabha
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

भेगडेंना पक्षातून आव्हान

मावळ मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके आमदार आहेत. त्यामुळे महायुतीतून ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. अशात गेल्या वेळी पराभूत झालेले माजी मंत्री बाळा भेगडे यांची अडचण झाली आहे.

दरम्यान मावळच्या भाजप नेत्यांनी प्रदेश भाजपकडे प्रस्ताव पाठवत ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी मागणी केली आहे.

या जागेवर बाळा भेगडे ईच्छुक असताना त्यांना पक्षातूनही आव्हान निर्माण झाले आहे. कारण मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवशी बॅनरबाजी करत आपणच विधानसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

Maval Vidhan Sabha
सोलापुरात पुन्हा मराठा आरक्षणाचे वादळ! बुधवारी शांतता रॅली; जरांगे पाटलांची ‘या’ चौकात सभा; शेतकऱ्याची मुलगी करणार स्वागत; किती लोक येणार, कसे आहे नियोजन, वाचा...

शेळकेंकडून गेल्या वेळी बंडखोरी

2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे भाजपमध्ये होते. तेव्हा ते विधानसभा निवडणूक लढण्यास ईच्छुक होते. पण त्यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत पुन्हा बाळा भेगडे यांनी संधी दिली होती. त्यानंतर सुनील शेळके यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.