पुणे : अॅमेझॉन विरोधात पुण्यात मनसे सेना आक्रमक झाली असून कोंढाव्यातील अमेझॉनचे ऑफिस आज मनसे कार्यकर्त्यांनी फोडले आहे. ''अमेझॉनच्या वेबसाईटवर
मराठी भाषेला स्थान मिळावे,'' अशी मागणी मनसेने अॅमेझॉनकडे केली होती. विनंती करुनही अॅमझॉनने दखल न घेतल्याने मनसे आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान हा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. या प्रकरणी राज ठाकरेंना बजावेलेली नोटीस चूकीची असल्याचे सांगत मनसे कार्यकत्यांनी अॅमेझॉनचा निषेध व्यक्त केला आहे.
स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची केशर ही लवकरच मिळणार
अमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेला स्थान मिळावे, अशी मागणी मनसेने अॅमेझॉनकडे केली होती. तसे झाल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते बेवसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने एका महिन्याने मनसेने अॅमेझॉनविरोधात ही मोहीम हाती घेतली. त्यानुसार 'नो मराठी, नो अॅमेझॉन' म्हणत कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतली आहे.
पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी
दरम्यान, मुंबईतही अॅमझॉन विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अॅनझॉनचे जाहीरातीचे बोर्ड फाडले आणि उतरविले आहेत. यावरुन राज ठाकरे व मनसेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अॅमझॉनने दिंडोशी न्यायालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसेविरुध्द खासगी तक्रार दाखल केली आहे. न्यायलयाने सदर प्रकरणी 5 जानेवारीला न्यायलयात उपस्थित राहण्याचे आदेश देत नोटीस बजावली आहे. राज ठाकरे व मनसेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायलायाने नोटीस बजावली आहे. राज ठाकरेंना बजावेलेली नोटीस चूकीची असल्याचे मत मनसे कार्यकत्यांचे आहे. त्यामुळे अॅमेझॉन विरोधात पुण्यात मनसे सेना आक्रमक झाली असून कोंढाव्यातील अमेझॉनचे ऑफिस आज मनसे कार्यकर्त्यांनी फोडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.