राज ठाकरे म्हणाले,' तु तुझा प्रचार कर, बाकी मी बघतो'

MNS chief Raj Thackeray consoled Rupali Patil for threat pune graduate election
MNS chief Raj Thackeray consoled Rupali Patil for threat pune graduate election
Updated on

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला राज्यभर सुरु झाले आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी, मनसे सर्व पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. पण, मनसेच्या पुणे पदवीदार मतदार संघ्याच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना साताऱ्यातून जिवे मारण्याच्या धमकीचा दूरध्वनी आला आणि एकच खळबळ उडाली. या बाबत पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिस कारवाईस प्रारंभ झाला आहे. याच प्रकरणावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन करुन दिलासा दिला आहे.

''तु तुझा प्रचार कर, बाकी मी बघतो''असे सांगून राज ठाकरे यांनी फोनवरुन दिलासा दिला. तसेच, पाटील यांची विचारपूस करत प्रचारबाबतही माहिती घेतली. 

या कॉलद्वारे मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

नेमके काय आहे प्रकरण?
पुणे पदवीधर मतदारसंघात प्रचार करीत असताना रुपाली पाटील यांच्या मोबाईलवर शनिवारी(ता.२१) एक दूरध्वनी आला. त्यावेळी बोलणाऱ्या व्यक्तीने पाटील यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच ''आमदार व्हायचे स्वप्न बघू नका, असेल तेथे येऊन संपवून टाकेल,'' अशा आशयाची धमकी साताऱ्यातून दाभाडे बोलत आहे, असे सांगत आक्षेपार्ह वक्‍तव्येही केली.

आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी 

धमकीचा फोन येताच पाटील यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित आरोपीचा शोध घेवून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पाटील यांच्या दूरध्वनीमध्ये हा कॉल रेकॉर्ड झाला असून त्याची कॉपी, संबंधित मोबाईल क्रमांक त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केला आहे. 

 
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत रंगणार चुरशीचा सामना :

पुणे पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अरुण लाड, मनसेकडून रुपाली पाटील ठोंबरे, अपक्ष श्रीमंत कोकाटे आदी निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात सुमारे 4 लाख 26 हजार मतदार असून त्यातील 1 लाख 36 हजार मतदार पुण्यातील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()