Kasba Bypoll: भाजपच्या विजयासाठी मनसे शेवटच्या क्षणी मैदानात; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आदेश!

निवडणुकीसाठी सक्रिय होण्याचे राज ठाकरेंचे आदेश!
Raj Thackrey
Raj ThackreyEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. अशातच कसबा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत पूर्ण क्षमतेने लढण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना काल (शुक्रवारी) रात्री दिले आहेत.

अशातच मनसे नेते बाळा नांदगावकर गेल्या दोन दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तळ ठोकून आहेत. आता मतदान होईपर्यंत ते पुण्यातच असणार आहेत. कसबा आणि चिंचवड येथील निवडणुका होईपर्यंत ते पुण्यातच असणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतदानासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर काम करण्याचे आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यानुसार पक्षाचा प्रत्येक मनसेसैनिक भाजपाचे उमेदवार रासने यांच्यासाठी काम करणार असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले आहे.

Raj Thackrey
Aurangabad: नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न अन् उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर!

काल (शुक्रवारी) संध्याकाळी प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा या संदर्भातील आदेश सर्व मनसैनिकांना देण्यात आले आहेत. सुरवातीपासून मनसे या निवडणुकीपासून दोन हात लांब राहीली होती. या निवडणुकीत मनसे थेट निवडणुकीच्या प्रचारात उतरणार नव्हती. त्यांनी केवळ भाजपला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं होतं.

काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचारामध्ये मनसे कुठेही सक्रिय दिसली नाही. मात्र, आता निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच मनसेच्यावतीने भाजपासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Raj Thackrey
राज्यात दररोज ८ शेतकऱ्यांची आत्महत्या; ७ महिन्यांत १७१७ आत्महत्या; ७७३ कुटुंबांना मदत नाहीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.