Pune Loksabha: मनसेची लोकसभा उमेदवारांची यादी ठरली! तात्या होणार पुण्याचे 'खासदार'?

Pune Loksabha
Pune Loksabha
Updated on

Pune Loksabha: लोकसभा २०२४ साठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने महाराष्ट्र महाराष्ट्रात 'मिशन ४५' काम सुरु केले आहे. तर इंडिया आघाडी देखील ताकदीने मैदानात उतरणार आहे. दरम्यान मनसे लोकसभा निवडणुकीत लढवणार हे निश्चित झाले आहे.

मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. यामध्ये पुण्यातील उमेदवाराचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे.

मनसे कल्याण, ठाणे, पुणे, संभाजी नगर, सोलापूर यासह एकूण ९ लोकसभा मतदार संघात चाचपणी करत आहे. मनसेने पुण्यात वसंतराव मोरे यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पुण्यात वसंतराव मोरे यांची लोकप्रियता बघता प्रतिष्ठीत उमेदवाराच्या देखील अडचणी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

Pune Loksabha
Pune News : बहिणीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवावा; अभिनेत्री भाग्यश्री मोटेची उच्च न्यायालयात धाव

मनसेचे संभाव्य उमेदवार-

  1. कल्याण लोकसभा - श्री राजू पाटील

  2. ठाणे लोकसभा - श्री अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव

  3. पुणे लोकसभा - श्री वसंतराव मोरे

  4. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- सौ.शालिनीताई ठाकरे

  5. दक्षिण मुंबई लोकसभा- श्री बाळा नांदगावकर

  6. संभाजी नगर लोकसभा - प्रकाश महाजन

  7. सोलापूर लोकसभा - दिलीप धोत्रे

  8. चंद्रपूर लोकसभा - श्री राजू उंबरकर

  9. रायगड लोकसभा - वैभव खेडेकर (Latest Marathi News)

Pune Loksabha
PAK vs NED World Cup: पाकिस्तानची विजयी सुरुवात...नेदरलँड्सविरुद्धचा सामना घातला खिश्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.