Pune News : महापालिका आयुक्तांची बदली करा - मनसेची मागणी

महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांनी काम करताना सर्व सामान्य लोकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देणे गरजेचे आहे.
mns party activist demand to transfer of pune municipal commissioner vikram kumar eknath shinde
mns party activist demand to transfer of pune municipal commissioner vikram kumar eknath shindesakal media
Updated on

Pune News : महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्तांनी काम करताना सर्व सामान्य लोकांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण विक्रम कुमार यांच्या कार्यकाळात लोकशाही दिन जवळपास बंद पडल्यासारखी अवस्था आहे, जनता दरबार घेण्यास त्यांना वेळ मिळत नाही. शिवाय शहरातील समस्याही सोडविता आलेल्या नाहीत.

त्यामुळे कार्यकाळ पूर्ण झालेल्या विक्रम कुमार यांची त्वरित बदली करा, अशी मागणी मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवले आहे.

नगरसेवक काम करू देत नाही असे खापर लोकप्रतिनिधींवर फोडले जाते. पण महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने गेल्या दीड वर्षापासून आयुक्तांच्या माध्यमातून शहरात कामे केली जात आहेत.

लोकप्रतिनिधी नसताना जनताभिमुख कार्य करण्याची आणि रेंगाळलेले प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी आयुक्तांची होती, पण महापालिकेत परिस्थिती नेमकी उलटी आहे. आयुक्तांना सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी वेळ नाही.

शहराचा विचार केला जात ३० कोटी रुपये खर्च करून नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग राजकीय दबावाला बळी पडून रात्रीतून काढून टाकण्यात आली, यात जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला. नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘जायका’ प्रकल्पाचे काम सुरु झाले, पण महापालिकेला वेगाने काम करता आलेले नाहीत.

लोकशाही दिन बंद केला, जनता दरबारात येण्यास आयुक्तांना वेळ नाही. शहरासाठी महत्त्वाचे असलेले पार्किंग धोरण धूळखात पडले आहे, प्रशासक काळात त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सायकल ट्रॅककडे दुर्लक्ष करण्यात आले.

प्रशासकीय राजवटीत केवळ मंत्री, आमदार, खासदारांच्या तालावर नाचून त्यांच्या हिताचे निर्णय केले जात आहेत. यात पुणेकरांना कोणताही लाभ झालेला नाही. त्यामुळे विक्रम कुमार यांची बदल करून जनताभिमुख अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी संभूस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.