रस्ते अपघातात प्रवासी दगवण्याची किंवा रस्त्यांवर कुत्री-मांजरांना वाहनाने धडक दिल्याच्या घटना सतत पाहायला मिळतात. रस्त्याच्या कडेल मृत पडलेले हे प्राणी पाहून जाणारे येणार लोक क्षणभर हळहळतात आणि पुढे चालू लागतात. पुण्यासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शहरात देखील एका श्वानाला आपल्या महागड्या कारखाली चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याघटनेची मनसेचे नेते वंसत मोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
वंसत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. पुण्यातील गुडलक चौकाजवळ 'डॉन' नावाच्या श्वानाला स्वतःच्या कारखाली चिरडून मारणाऱ्या व्यक्तीविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वंसत मोरे यांनी त्यांच्या पोस्टमधून नेमकं काय झालं याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी उद्या रविवार १३ ऑगस्ट सायं. ठीक ६ वाजता गुडलक कॅफे समोर डॉनची श्रद्धांजली सभा असल्याचे देखील सांगितले.
वसंत मोरे काय म्हणाले?
भावपूर्ण श्रद्धांजली पुण्याच्या गुडलक चौकातील "डॉनला".
"त्याचं झालं असं, ५ ऑगस्ट ला दु. २ वाजता पुण्यातील गुडलक चौकात डॉन रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे झोपला होता आणि अचानक पुण्यातील एका नामांकित सोन्याच्या दुकानाच्या मालकाच्या जहागीरदार पोराची ४ कोटीची लँबोर्गीनी गाडी आली.
सिग्नल पडला होता म्हणून हा जहागीरदार लोकांना समजावं हा कोण आहे म्हणून याची महागडी गाडी रेस करत होता. त्यामुळे रस्त्याकडेला झोपलेल्या डॉनची झोपमोड झाली आणि तो त्या आवाजाच्या दिशेने धावला. टायरला तो आता चावतो की काय, माझ्या गाडीचे नुकसान करतो की काय या भीतीने ह्या मोठ्या बापाच्या लेकाने त्याला त्याच्या गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली घेतला. थोडा थांबला असता तर कदाचित डॉन वाचलाही असता पण या मोठ्या बापाच्या औलादीने गाडी तशीच पुढे रेटली आणि डॉनचा जीव घेतला."
"काही डॉग लव्हर्सने याची तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनला केली पण न्याय मिळत नव्हता. मी काल जाऊन आलो आणि आज या बड्या बापाच्या औलादीची गाडी थोडा वेळ पोलीस स्टेशनला आणून लावली पण काय झालं माहित नाही, गाडी परत गेली आहे. डॉनचा जीव तर गेलाय पण तुला सुट्टी नाही. त्यासाठी उद्या रविवार १३ ऑगस्ट सायं. ठीक ६ वाजता गुडलक कॅफे समोर डॉनची श्रद्धांजली सभा आहे. आम्ही सर्व जाणार आहोत."
याला धडा शिकवणारच ...
"विषय डॉनच्या मृत्यूचा नाही आज डॉनच्या जागी एखादा माणूसही असू शकला असता. मग काय याने त्यालाही चिरडलं असतं का? या बड्या बापांच्या औलादींचं डोकं ठिकाणावर आणण्याकरता सर्वांनी नक्की या. रस्ता हा पुणेकरांचा आहे, याच्या बापाचा नाही. याला धडा शिकवणारच ..." असेही वसंत मोरे म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.