Pune : धानोरीत मराठी भाषेचा अपमान करणार्‍याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप

Dhanori latest Marathi News |दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल व्हिडीओवर प्रसिद्ध झाला. यामुळे धानोरीतील मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यावसायिकाकडे भेट दिली.
beating
beating esakal
Updated on

विश्रांतवाडी : धानोरी उपनगरातील एका व्यावसायिकाकडे काम करणार्‍या परप्रांतीय कामगाराने मराठी ग्राहकांशी वाद घालत ‘‘मराठी भाषा मला कळत नाही, मराठीतच बोलणे हा नियम आहे का? मी मराठीत बोलणार नाही, काय करायचे ते करा?’’ असे म्हणत हेकेखोरपणे उद्धट वर्तन करणार्‍या कामगाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठी दणका दिला.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ संपूर्ण राज्यात सोशल व्हिडीओवर प्रसिद्ध झाला. यामुळे धानोरीतील मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यावसायिकाकडे भेट दिली. त्याचे उद्धट वागणे व मराठीबद्दलची अनास्था पाहून मनसे कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलले.

यावेळी मनसेचे गणेश पाटील, अरुण येवले, मनोज ठोकळ, अच्युतराव मोळावडे, कृष्णा मोहिते, कैलास गव्हाणे, सागर खांदवे, सिद्धार्थ वंजारी, किरण पाखरे, शुभम महिंदरकर आदी मनसे सैनिक उपस्थित होते. यासंदर्भात बोलताना गणेश पाटील म्हणाले की ती व्यक्ती मराठीबद्दल राग व द्वेषाने बोलत होती. म्हणून त्याला धडा शिकवणे गरजेचे होते.

महाराष्ट्रात परप्रांतीय येऊन व्यवसाय करतात, पण इथल्या भाषेबद्दल त्यांना अजिबात आत्मियता नाही, हे योग्य नाही. आपल्या मराठी भाषेबद्दल, महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचा अपमान कदापि खपवून घेतले जाणार नाही म्हणजे नाही.

यासाठी कितीही वेळा आंदोलने व करण्याची तयारी असेल. दरम्यान असे उद्धट वर्तन करणार्‍या कामगाराने माफी मागितली असून त्याला त्याच्या मालकाने कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.