Yogi Adityanath : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोहन भागवत, योगी आदित्यनाथ पुण्यात?

Yogi Adityanath and mohan bhagawat
Yogi Adityanath and mohan bhagawat
Updated on

मुंबई - गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर राहिला आहे. पुण्यात गणेशोत्सवाची तयारीही जोरात सुरू झाली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचा देखावा पुणेकरांच्या आकर्षणाचं प्रमुख स्थान असतं. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिर साकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात येण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Yogi Adityanath and mohan bhagawat
केंद्राच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न होवू शकतो; नाना पटोलेंचा दावा

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी मोहन भागवत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी योगी आदित्यनाथ देखील पुण्यात येण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

Yogi Adityanath and mohan bhagawat
Mumbai News : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठ पदरी होणार; एमएसआरडीसीने राज्य शासनाला पाठवला प्रस्ताव

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गणेशोत्सवासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.